Bronx Fire: न्यूयॉर्क शहरातील आगीत ९ मुलांसह १९ मृत्यूमुखी; ध्वज अर्ध्यावर घेतले

ही इतिहासातील सर्वात भीषण आग मानली जात आहे.
New York
New York Twitter

न्यूयॉर्क: न्यूयॉर्क शहरातील (New York City) एका अपार्टमेंटमध्ये लागलेल्या आगीत नऊ मुलांसह १९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या आगीत माेठ्या संख्येने नागरिक जखमी झाले आहेत. अमेरिकेतील अलीकडील काळातील निवासी क्षेत्रात लागलेल्या माेठ्या आगींपैकी (fire) ही एक म्हणावी लागेल. आजची घटना दुर्देवी तसेच वेदनादायी असल्याची भावना महापौर एरिक अॅडम्स यांनी व्यक्त केली. (19 dead 63 injured in new york city apartment fire official)

New York
Rafael Nadal: मेलबर्न समर सेट करंडक जिंकला; 'हे कोर्ट नेहमीच माझ्यासाठी खास'

न्यूयॉर्क शहर अग्निशमन विभागाचे (fire brigade) आयुक्त डॅनियल निग्रो यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनूसार मार्शलने भौतिक पुराव्यांद्वारे आणि रहिवाशांच्या (residents) प्रत्यक्ष लेखणीद्वारे ही आग पोर्टेबल इलेक्ट्रिक हीटरमुळे लागली. प्रथम आग बेडरूममध्ये लागली आणि नंतर ती पसरली असे अहवालात स्पष्ट केले.

ब्रॉन्क्स प्राणीसंग्रहालयाच्या पश्चिमेला असलेल्या पूर्व १८१ व्या रस्त्यावरील १९ मजली इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर आधी लागलेल्या आग विझविण्यासाठी आणि मदत कार्यासाठी सुमारे २०० अग्निशामकांनी धाव घेतली.

या दुर्घटनेतील जखमींना विविध पाच रुग्णालयात नेण्यात आले आहे. अनेकांना हृदयविकार आणि श्वसनक्रिया बंद पडणे आदींचा त्रास झाला आहे असे अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे. दरम्यान सुमारे ३० वर्षांपूर्वी ब्रॉन्क्समध्ये लागलेल्या आगीत सुमारे १३ लाेकांचे जीव गेले हाेते. गेल्या वेळी पेक्षा आत्ताची आग भीषण हाेती. सध्यस्थितीत १९ जणांचा मृत्यू झाल्याचे अग्नीशामक विभागाचे अधिका-यांनी नमूद केले.

ब्रॉन्क्समधील (Bronx Fire) घटना दुःखद असून या आगीत मृत्यू झालेल्यांना अदारांजली म्हणून न्यूयॉर्क शहराचे महापौर एरिक अॅडम्स यांच्या आदेशानुसार, सर्व ध्वज अर्ध्यावर फडकवले जाणार आहेत. ही कार्यवाही १२ जानेवारी २०२२ पर्यंतच्या सूर्यास्त होईपर्यंत राहील असे महापौर यांच्या कार्यालयाने कळविले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com