Bank Deposit 2 Lakhs : ४० गावकरी झाले रातोरात लखपती; अचानक खात्यात २ लाख जमा, नेमकं प्रकरण काय?

40 Villagers Millionaire : या लोकांच्या बँक खात्यात अचानक पैसे आल्याने गावकऱ्यांच्या आनंदात भर पडली.
2 Lakhs Suddenly Deposited
2 Lakhs Suddenly DepositedSaam TV

Money Transfer :

भारतातील एका राज्यात रातोरात ४० गावकरी लखपती झाल्याची बातमी समोर आली आहे. ते गाव आहे ओडिशा. ओडिशातील केंद्रपाडा जिल्ह्यातील एका गावात राकोरात गावकरी लखपती झाले आहेत. या लोकांच्या बँक खात्यात अचानक पैसे आल्याने गावकऱ्यांच्या आनंदात भर पडली.

जवळपास ४० बँक खात्यांवर मोठी रक्कम जमा करण्यात आली होती. ज्यावेळी बँकेत पैसे जमा झाल्याचा मेसेज खातेधारकांना मिळाला तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यानंतर लगेच सकाळी गावकऱ्यांनी बँकेत लांबलचक रांगा लावून पैसे काढण्यास सुरुवात केली.

2 Lakhs Suddenly Deposited
Gold Silver Rate (9th September) : सोन्याला अच्छे दिन! चांदी जैसे थे, काय आहे आजचा सोन्याचा भाव?

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना आहे. केंद्रपाडा जिल्ह्यातील औल ब्लॉकमधील ओडिशा ग्रामीण बँकेच्या (Bank) बाटीपाडा शाखेत घडली आहे. या बँकेतील खातेधारकांच्या खात्यावर अचानक मोठ्या प्रमाणात पैसे जमा करण्यात आले. त्यामुळे पैसे काढण्यासाठी लोकांनी बँक गाठली. या काळात काही गावकऱ्यांनी पैसे (Money) काढले तर काहींना रिकाम्या हाती घरी परतावे लागले.

या ४० गावकऱ्यांना त्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज आला. त्यात हजार रुपयांपासून ते २ लाखांपर्यंत पैसे जमा करण्यात आल्याची माहिती समोर आली. बँकेत पैसे काढण्यासाठी गर्दी झाल्यामुळे तेथील अधिकाऱ्यांना संशय आला. अधिकाऱ्याला समजल्यास त्यांना तात्काळ पैसे काढण्याची सुविधा बंद केली.

2 Lakhs Suddenly Deposited
Smart and Intelligent Women : इंटेलिजंट महिलांमध्ये असतात खास गुण, कसे ओळखाल?

1. गर्दी वाढल्याने शंकेची पाल चुकचुकली

रोजच्या सारखी बँक सुरळीत सुरु असताना एकाच वेळी गावकऱ्यांनी बँकेत गर्दी केली त्यामुळे मॅनजेरच्या मनात संशय आला. विचारपूस केल्यानंतर अधिकाऱ्यांने पैसे काढण्यास बंदी घातली. अचानक रातोरात इतकी मोठी रक्कम जमा झाल्याने नेमका काही तरी घोळ आहे हे समजले. सध्या काही काळासाठी पैसे काढण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा बँक अधिकारी तपास करत आहेत. इतके पैसे गावकऱ्यांच्या खात्यात कुणी टाकले याची चौकशी सुरु आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com