समलिंगी मैत्रिणींमध्ये जडलं प्रेम; लग्नासाठी घरातूनही पळाल्या, पण शेवटी आलं वेगळंच वळण

Weird Love Story : दोघींनाही लग्न करून एकमेकांची आयुष्यभर साथ द्यायची आहे. मात्र, दोघींचेही कुटुंब त्यांच्या या नात्यासाठी तयार नाहीये.
समलिंगी मैत्रिणींमध्ये जडलं प्रेम; लग्नासाठी घरातूनही पळाल्या, पण शेवटी आलं वेगळंच वळण
Weird Love Story in MarathiSaam Tv

पटना : दोन तरुणी एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून एकमेकांना भेटल्या. दोघीही साधारण 20 ते 21 वर्ष वयाच्या. कालांतराने दोघींमध्ये घट्ट मैत्री झाली आणि प्रेम बहरलं. दोघीही एकमेकींच्या इतक्या प्रेमात बुडाल्या की त्यांनी सामाजिक बंधनं तोडून समलैंगिकतेचं नातं प्रस्थापित केलं. दोघींमध्ये आजवर अनेकदा समलैंगिक संबंध प्रस्थापित झाले. आता दोघींनाही लग्न करून एकमेकांची आयुष्यभर साथ द्यायची आहे. मात्र, दोघींचेही कुटुंब त्यांच्या या नात्यासाठी तयार नाहीये. (Weird Love Story)

Weird Love Story in Marathi
पती झोपेत करायचा असे कृत्य, शेवटी कंटाळून पत्नीने घेतला अजब निर्णय!

बिहारच्या पटना शहरातून प्रेमाचं हे विचित्र प्रकरण समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वी 22 वर्षीय श्रेया आणि 21 तनुश्री (नावे बदललेली आहे) या दोन तरुणींमध्ये एका कॉमन फ्रेंडसच्या माध्यमातून मैत्री झाली. त्यानंतर दोघीही एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी बनल्या. मात्र, कालांतराने दोघींमधील जवळीक इतकी वाढत गेली की, त्यांनी एकमेकांसोबत जगण्या-मरण्याचा निर्णय घेतला. या काळात दोघींमध्ये अनेक वेळा समलैंगिक संबध प्रस्थापित झाले. दोघींचाही प्रेमात आकंठ इतका बुडाला की, त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

मात्र, जेव्हा या तरुणींनी आपल्या लग्नाविषयी कुटुंबियांना कल्पना दिली. तेव्हा दोघींच्याही कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली. समाजात आपली काय प्रतिष्ठा राहिल, या भीतीने श्रेया आणि तनुश्री यांच्या कुटुंबियांनी लग्नास नकार दिला. मात्र, कुटुंबियांचा हा नकार दोनही तरुणींना मान्य नव्हता. अखेर दोघींनीही पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि दिल्ली शहर गाठलं. दरम्यान, हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं. तनुश्रीच्या कुटुंबियांनी श्रेयावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

Weird Love Story in Marathi
अरेरे! McDonald’s मध्ये रांगेत उभा असताना केलं प्रेमिकेला प्रपोज, पण... (पाहा Viral Video)

पटना पोलिसांच्या माहितीनुसार, दोघीही तरुणी 4 दिवसांपूर्वी घरातून पळून गेल्या. जेव्हा पोलिसांनी या दोन तरुणींचा शोध घेतला तेव्हा श्रेयाने तिच्याच कुटुंबियांवर मानसिक छळ करण्याचा आरोप केला. श्रेयाच्या म्हणण्यानुसार, तिच् तनुश्रीच्या कुटुंबियांकडून दोघींनाही सतत टॉर्चर केलं जात होतं, अशात गुरुवारी दोघी दिल्लीला निघून गेल्या. तनुश्रीच्या म्हणण्यानुसार, 'काका विशाल वर्मा आणि मामा अंबर कश्यप यांनी केस दाखल करत श्रेया घोषने माझे अपहरण केल्याचा आरोप केला आहे, मात्र हे सत्य नाही. मी श्रेयासोबत स्वेच्छेने आले आहे. काका आणि मामा मला सतत धमक्या देत आहेत. आम्ही एकत्र आलो तर ते आम्हाला जीवे मारणार आहेत. यासोबतच श्रेयाच्या कुटुंबीयांनाही वाईट पद्धतीने त्रास देत आहेत.'

दरम्यान, तनुश्री आणि श्रेया या दोघींचंही पोलिसांनी समुपदेश केलं. मात्र तरीही, त्या लग्न करण्याच्या गोष्टीवर ठाम आहेत. दोघींनाही एकत्र राहायचं आहे. श्रेया म्हणते की आम्हाला लग्न करायचं आहे, कायद्याने परवानगी दिली तर आम्ही तेच करू. तर तनुश्री म्हणते की, काहीही झालं तरी तिला श्रेयासोबत राहायचं आहे. आता पाटना पोलीस दोघींच्याही कुटुंबियांना या प्रकरणाबाबत नोटीस पाठवणार असल्याची माहिती आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.