
Saudi Arabia Bus Fire : इस्लाम धर्माचा पवित्र महिना रमजानच्या पहिल्याच आठवड्यात सौदी अरेबियातून एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. सध्या रमजानचा महिना सुरू आहे. या महिन्यात मक्का येथे दर्शनासाठी जात असलेल्या भाविकांच्या बसला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. (Latest Marathi News)
या दुर्घटनेत तब्बल २० भविकांचा होरपळून मृत्यू झाला. तर २९ भाविक हे जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मृत व्यक्ति नेमके कुठले होते, या बाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही.
ही घटना सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) दक्षिण भागातील असीर प्रांतात घडली. ही बस सर्व भाविकांना मक्का आणि मदिण येथे घेऊन जात होती. या घटनेचा एक व्हिडिओ देखील पुढे आला असून या अपघाताची भीषणता यातून दिसत आहे. संपूर्ण बस आगीच्या विळख्यात सापडली असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. (Accident News)
रमजान महिन्यात लाखो मुस्लिम उमराहसाठी मक्का शहराकडे येत असतात. त्यामुळे सौदीतील रस्ते वर्दळीचे होऊन अनेक अपघात होतात. यादरम्यान सौदी अरेबियातही ट्रॅफिक जामची समस्या उद्भवते.
यापूर्वीही अपघात झाले आहेत
दरम्यान, अशीच एक घटना 2019 साली घडली होती ज्यात एका बसला एका अवजड वाहनाने धडक दिली होती. या अपघातात ३५ नागरिकांचा मृत्यू झाला होता चार जण जखमी झाले होते. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मक्काच्या दिशेने जाणाऱ्या बसला झालेल्या अपघातात दोन जणांना आपला जीव गमवावा लागला होता तर 18 जण जखमी झाले होते.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.