Israel-Hamas War: इस्राइलमधील २३० भारतीयांना आणणार मायदेशी; सरकार करणार सर्व खर्च

Israel-Hamas War: भारत सरकारकडून ऑपरेशन अजय राबवले जात आहे.
Israel-Hamas War
Israel-Hamas WarSaam Tv

Israel-Hamas War:

इस्राइल आणि हमासच्या दहशतवादी संघटनेमध्ये युद्ध चालू आहे. हमासकडून इस्राइलवर रॉकेट हल्ले करण्यात येत आहे. इस्राइलही या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देत आहे. हमास संघटनेला मिटवण्याचा निश्चय पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी केलाय. यादरम्यान इस्राइलमधील भारतीयांच्या सुरक्षतेसाठी भारत सरकारकडून पावले उचलली जात आहे. (Latest News)

इ्स्राइलमधील भारतीयांना आणण्यासाठी पहिला चार्टर विमान आज बेन गुरियन येथील विमानतळावरून उड्डाण घेणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज रात्री ९ वाजता २३० नागरिकांना घेऊन हे विमान उड्डाण भरणार आहे. या प्रवासाचा सर्व खर्च भारत सरकार करणार आहे.

भारत सरकारकडून ऑपरेशन अजय राबवले जात आहे. ज्या लोकांना इस्राइलमधून भारतात यायचे आहे, पण त्यांना हवाई सेवा मिळत नाही. अशा लोकांना या विमानातून देशात आणले जाणार आहे. इस्राइल-हमासच्या दरम्यान युद्ध सुरू होताच एअर इंडियाने आपली हवाई सेवा बंद केली होती. या चार्टर विमानाने जे नागरिक भारतात येतील त्यांच्याकडून कोणताच खर्च वसूल केला जाणार नाही. भारत सरकार त्याच्या संपूर्ण प्रवासाचा खर्च उचलणार आहे. इस्राइलमध्ये साधरण १८ हजार भारतीय नागरिक राहतात. येथे साधरण १ हजार विद्यार्थी, इजिनिअर्स आणि हिरा व्यापारी राहतात.

नोंदणीसाठी दूतावासाने जाहीर केली लिंक

इस्राइलमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी तेथील भारतीय दूतावासाकडून मार्गदर्शन सुचना देण्यात आलीय. ज्या लोकांना भारतात यायचं आहे, अशा नागरिकांनी इस्राइलमधील तेल अलीवमध्ये आपली नोंदणी करावी. दूतावासाकडे नोंदणी केल्यानंतर त्यांना मदत मिळेल. https://indembassyisrael.gov.in/whats?id=dwjwb या लिंकवरून करता येणार नोंदणी

आपातकालीन हेल्पलाइन नंबर

इस्राइलमधील भारतीय दूतावासाकडून एक आपातकालीन हेल्पलाइन नंबर, संपर्क नंबर, आणि ईमेल आयडी जाहीर केलीय. +९७२-३५२२६७४८ आणि + ९७२-५४३२७८३९२ . तसेच Email: cons1.telaviv@mea.gov.in वेबसाईट दिलीय.

Israel-Hamas War
#Shorts | Sanjay Raut News | पॅलेस्टाईनमधील सत्ताधारी हमास आणि इस्रायल यांच्यामध्ये संघर्ष

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com