साखरपुड्यात उडाली खळबळ; रबडी खाल्ल्यानंतर वधू-वरासह २७२ पाहुण्यांना विषबाधा

Madhya Pradesh News: साखरपुड्यात रबडी खाल्ल्यानंतर २७२ जणांना उलटी, पोटदुखीचा त्रास .
साखरपुड्यात उडाली खळबळ; रबडी खाल्ल्यानंतर वधू-वरासह २७२ पाहुण्यांना विषबाधा
Madhya Pradesh NewsSaam Tv

बैतूल: मध्य प्रदेशातील बैतूलमध्ये गुरुवारी रात्री उशिरा धक्कादायक प्रकार घडला. साखरपुडा सोहळ्यात जेवणानंतर जवळपास २७२ पाहुण्यांना उलटी आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. विषबाधा झाल्यानं सर्वांना तात्काळ रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आलं. विषबाधा झालेल्या २७२ जणांपैकी बहुतांश पाहुण्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्यांना रुग्णालयातून उपचारानंतर सोडण्यात आले आहे. तर उर्वरित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. (Madhya Pradesh News)

Madhya Pradesh News
Ramdas Athavale On Shashi Tharoor : इंग्रजीचे मास्तर बनून आठवलेंनी घेतली शशी थरूर यांची शाळा; पाहा व्हिडीओ

बैतूलमधील बोरदेही पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पिंडरई गावात मुलीचा साखरपुडा होता. या सोहळ्याला वर आणि वधूपक्षाकडील जवळपास ६०० पाहुणे आले होते. यातील जवळपास ४०० पाहुण्यांनी जेवण केलं. अर्ध्या तासानंतर यातील अनेकांना उलटी आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. रबडी खाल्ल्याने विषबाधा झाल्याने प्रकृती बिघडल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर स्थानिकांनी तात्काळ पाहुण्यांना मुलताईच्या आरोग्य केंद्रात दाखल केलं. सरकारी रुग्णालयात जागा कमी असल्यानं प्रशासनानं दोन खासगी रुग्णालयांमध्ये काहींना दाखल केलं. रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत, यासाठी इतर ठिकाणांवरील रुग्णालयांतून डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. विषबाधा झालेल्या रुग्णांमध्ये वधूसह महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.

हे देखील पाहा

या घटनेची माहिती मिळताच, बैतूलचे जिल्हाधिकारी मुलताईला पोहोचले. त्यांनी रुग्णांची विचारपूस केली. सर्व रुग्णांना चांगले उपचार द्यावेत, असे आदेश रुग्णालय प्रशासनाला दिले. साखरपुडा सोहळ्यात मिठाई खाल्ल्याने लोकांना विषबाधा झाली. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. अनेकांना उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. काही लोकांवर उपचार सुरू आहेत. तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना बैतूलच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस आणि प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जेवणाचे नमुने घेतले असून, ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येतील. अहवाल आल्यानंतर विषबाधा कशातून झाली, हे स्पष्ट होणार आहे. (Madhya Pradesh News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.