मोठा अपघात टळला! हवेत लटकलेले २८ पर्यटक सुखरूप बचावले

मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यामध्ये शारदा शक्तिपीठ मैहर येथे वादळामुळं रोप वेच्या ७ ट्रोल्या हवेत लटकल्याची घटना समोर आली आहे.
Ropeway
RopewaySaam Tv

सतना : मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh ) सतना जिल्ह्यामध्ये शारदा शक्तिपीठ मैहर येथे वादळामुळं रोप वेच्या ७ ट्रोल्या हवेत लटकल्याची घटना समोर आली आहे. या भीतीदायक प्रकारामुळं ट्रॉलीमध्ये बसलेल्या २८ श्रद्धाळूंचा जीव टांगणीला लागला. एका ट्रॉलीमध्ये केवळ ४ जण बसण्याची परवानगी असतानाही या सात ट्रॉलीत एकूण २८ श्रद्धाळू बसले होते. ट्रॉल्या मध्येच लटकल्यानं या श्रद्धाळूंमध्ये एकच घबराट पसरली होती. हे सर्व पर्यटक ( Tourist ) ४० मिनिटं हवेत अडकले होते. (Madhya Pradesh Latest News In Marathi )

हे देखीला पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार, शारदा शक्तिपीठ मैहर येथे २८ श्रद्धाळू हवेत रोप वेच्या ट्रोलीत अडकले होते. शारदा शक्तिपीठावर जाण्यासाठी त्रिकृट पर्वत हा पार करावा लागतो. शक्तिपीठापर्यंत पोहोचण्यासाठी रोप वेनं जावं लागतं. त्यासाठी २८ श्रद्धाळू रोप वेच्या ट्रॉलीमध्ये बसले. एका ट्रॉलीमध्ये केवळ ४ जण बसण्याची परवानगी होती, परंतु या सात ट्रॉलीत एकूण २८ श्रद्धाळू बसले होते. त्यानंतर अचानक आलेल्या वादळामुळं रोप वेच्या ट्रॉल्या हलू लागल्या. त्यामुळं ट्रॉलीमध्ये बसलेल्या श्रद्धाळूंमध्ये घबराट पसरली. त्यामुळं तातडीने ट्रॉली चालवणे थांबले. त्यामुळं रोपवे ४० मिनिटे एकच जागी थांबवण्यात आली. त्यामुळं ट्रॉलीत बसणाऱ्या लोकांचा जीव टांगणीला लागला. हवामान विभागाने पाऊस पडू शकतो, अशी माहिती देऊन तरीही रोप वेची सेवा चालू ठेवल्यानं ट्रॉली अडकल्याचं सांगण्यात येत आहे.

Ropeway
लाखभर सैन्य, शेकडो जहाज..; तैवानवर हल्ल्याचा चीनचा खतरनाक प्लान, ऑडिओ लीक

लोक ट्रॉलीमध्ये अडकताच मैहरचे तहसीलदार मानवेंद्र सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तहसीलदार मानवेंद्र म्हणाले,'मैहरमध्ये अवकाळी पाऊस कोसळल्याने जनजीवन विस्कळीत झालं होतं. त्यावेळी पाऊस आणि वादळ आलं. त्यात मैहरमध्ये काही भागात वीज गेली. त्याच दरम्यान काहीजण रोप वेच्या ट्रॉलीमध्ये अकडले होते. मात्र, त्यांना हळूहळू खाली उतरवण्यात आलं आहे. त्यामुळं सर्व पर्यटक सुखरूप बचावले आहेत, '. या घडलेल्या प्रकारावर एका श्रद्धाळूनं प्रतिक्रिया दिली आहे. 'रोपवेची ट्रॉली तब्बल ४० मिनिटे हवेत अडकली होती. त्यावेळी खूप भीती वाटली होती. आम्ही रोपवेनं जाताना वादळ आलं. त्यावेळी जीव टांगणीला लागला होता. दरम्यान झारखंडच्या देवघरमध्ये असाच प्रकार घडला होता, त्याची प्रचिती पुन्हा आली आहे.

Edited By - Vishal Gangurde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com