Corona Updates : देशात गेल्या २४ तासांत २,८९७ नवीन कोरोना रुग्ण

India Corona Updates : एकूण मृतांची संख्या ५,२४,१५७ वर पोहोचली आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
Corona Updates : देशात गेल्या २४ तासांत २,८९७ नवीन कोरोना रुग्ण
India Corona Updates 12th May 2022Saam Tv

नवी दिल्ली: देशात गेल्या २४ तासांमध्ये २,८९७ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर एकूण रुग्णसंख्या ही ४,३१,१०,५८६ वर पोहोचली आहे. याच सक्रिय रुग्णांची संख्या (Corona Patient) १९,४९४ वर आली आहे. कारोनामुळे गेल्या चोवीस तासांत ५४ रुग्ण दगावले आहेत. (India Corona Updates 12th May 2022)

आतापर्यंत एकूण मृतांची संख्या ५,२४,१५७ वर पोहोचली आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. एकूण संक्रमणांपैकी ०.०५ टक्के सक्रिय रुग्ण आहेत, तर बरे होण्याचा दर ९८.७४ टक्के आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने (Corona Updates) दिली आहे.

हे देखील पाहा -

India Corona Updates 12th May 2022
चांदीच्या दरात मोठी घसरण; सोनेही एक हजाराने डाऊन

२४ तासांच्या कालावधीत सक्रिय कोरोना रुग्णसंख्येत १४३ प्रकरणांची घट नोंदवण्यात आली आहे. मंत्रालयानुसार दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर ०.९५ टक्के आणि साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर ०.८२ टक्के नोंदविला गेला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.