काँग्रेसचा प्रस्ताव नाकारल्यानंतर प्रशांत किशोर यांचा मोठा निर्णय

जर बिहारचा विकास करायचा असेलतर सर्वांना पुढे यावे लागेल, असंही प्रशांत किशोर म्हणाले.
काँग्रेसचा प्रस्ताव नाकारल्यानंतर प्रशांत किशोर यांचा मोठा निर्णय
Prashant Kishor Latest Marathi News, Latest Political News in MarathiSaam Tv

नवी दिल्ली : काही दिवसापासून रणनीतिकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) हे काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. यासंबंधी काँग्रेसच्या हायकमांडसोबत प्रशांत किशोर यांच्या बैठका झाल्या. पण प्रशांत किशोर यांनी काँग्रेसचा प्रस्ताव नाकारल्या असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे ते आता नवा पक्ष सुरु करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. पण या संबंधी अजुनही त्यांनी जाहीर केलेले नाही. पण त्यांनी आज बिहारमध्ये २ ऑक्टोंबरपासून ३ हजार किलोमीटरची पदयात्रा काढून लोकांना भेटणार असल्याचे जाहीर केले आहे. (Prashant Kishor Latest Marathi News)

Prashant Kishor Latest Marathi News, Latest Political News in Marathi
Prashant Kishor | काँग्रेसला माझी गरज नाही, त्यांच्याकडे अनेक मोठे नेते आहेत - प्रशांत किशोर

'आरोग्यापासून ते रोजगारापर्यंत बिहारची परिस्थिती खराब आहे. भारत सरकारचे आकडे सांगतात, बिहार देशात सर्वांत खालच्या क्रमांकावर आहे. लालू प्रसाद यादव आणि नितीशकुमार यांच्या ३० वर्षांच्या सरकारनंतरही बिहार हे मागासलेले राज्य आहे. बिहारला पुढे न्यायचे असेल तर सर्वांना पुढे यावे लागेल. त्यासाठी नवा विचार आणि नव्या प्रयत्नांची गरज आहे, असंही प्रशांत किशोर (Prashant Kishor) म्हणाले.

माझ्या जवळ जे काही आहे, ते मी बिहारसाठी समर्पित करत आहे. बिहारच्या लोकांना जावून भेटणार आणि त्यांच्या समस्या जाणून घेणार, असल्याचे प्रशांत किशोर म्हणाले. राज्याची स्थिती आणि दिशा बदलण्यासाठी नव्या राजकीय पक्षाची गरज आहे असं त्यांनी म्हटले पण त्यांनी त्यासंबंधी कोणतीही घोषणा केली नाही.

Prashant Kishor Latest Marathi News, Latest Political News in Marathi
बिहार काँग्रेसची जबाबदारी कन्हैया कुमारच्या खांद्यावर पडणार?

याअगोदर प्रशांत किशोर यांनी ट्विट करुन बिहारमध्ये नवा पक्ष सुरु करणार असल्याचे संकेत दिले होते. यानंतर बिहारच्या राजकारणात चर्चा रंगल्या होत्या. आता प्रशांत किशोर यांनी ३ हजार किलोमीटरची पदयात्रा काढणार असल्याचे जाहीर करताच बिहारचे राजकारण ढवळून निघणार आहे. प्रशांत किशोर आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या पाऊलावर पाऊल टाकल्याचे बोलले जात आहे. रेड्डी यांनीही विधानसभा निवडणुकांच्या अगोदर आंध्रप्रदेशात पदयात्रा काढली होती.

Edited By- Santosh Kanmuse

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.