
वृत्तसंस्था: सध्या देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत देशात ३३२४ नवीन रुग्ण आढळले आहेत. राजधानी दिल्लीतून सर्वाधिक प्रकरणे समोर येत आहेत. दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या (Corona) नवीन रुग्णांनी १५०० आकडा पार केला आहे. गेल्या २४ तासांत दिल्लीत १५२० नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी, देशात सक्रिय रुग्णांची संख्या १९ हजारांच्या पुढे गेली आहे.
हे देखील पाहा-
गेल्या महिन्यात कोरोना संसर्ग (corona infection) आटोक्यात आल्यावर कोरोना निर्बंधापासून नागरिकांना दिलासा मिळाला होता. राज्य सरकारने राज्यातील सर्वच निर्बंध हटवून काही काळानंतर मास्कमुक्तीही केली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये वाढ (corona new patients) होत असून पुन्हा एकदा नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, आज शनिवारी ३० एप्रिलला राज्यात १५५ नव्या रुग्णांची भर पडल्याने चिंता वाढली आहे. सक्रिय रुग्णांची एकूण संख्या ९९८ वर पोहोचली आहे. तर आज शनिवारी कोरोनाच्या एका रुग्णाच्या मृत्यूची (corona death) नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना मृतांचा आकडा १,४७,८४३ वर गेला आहे.
शाळा पुन्हा होणार बंद?
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन दिल्ली सरकारनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. कोविड १९ चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यास सांगितले आहे. काही खासगी शाळांनी विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी वर्गाला मास्क घालणे अनिवार्य केले आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने पालकही चिंतेत आहेत. कोरोनाग्रस्त मुले बरेच दिवस घरी राहू शकतात. त्यामुळे त्यांच्यासाठी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय शाळांनी द्यायला हवा, अशी काही पालकांची मागणी आहे. दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत याबाबत काहीतरी निर्णय होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
Edited By- Digambar Jadhav
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.