
करनाल: हरयाणाच्या करनाल (karnal) जिल्ह्यातून चार संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, जप्त केलेला साठा हा आरडीएक्सचा असू शकतो. चंदीगड, करनालच्या आयबीची पथके दहशतवाद्यांची चौकशी करत आहेत. पोलिसांची अनेक पथके चौकशी करत आहेत. हे दहशतवादी अनेक ठिकाणी घातपात करण्याच्या तयारीत होते, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. (Terrorists arrested in Karnal)
चारही दहशतवाद्यांना गुरुवारी पहाटे चार वाजता बसताडा टोल प्लाझाजवळून अटक करण्यात आली. हे सर्व जण एका कारमधून जात होते. अटक केलेले सर्व दहशतवादी हे पंजाबहून दिल्लीच्या दिशेने जात असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. आयबीच्या रिपोर्टनंतर पोलिसांनी गस्त वाढवली. त्यानंतर या दहशतवाद्यांना अटक केली. दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर आजूबाजूच्या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. करनालमध्ये ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. रस्त्यारस्त्यांवर वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.