Boy Death After Chocolate Stuck in His Throat: हृदयद्रावक! चॉकलेटने केला चिमुकल्याचा घात, घशात अडकल्यामुळे गमावला जीव

Delhi Boy Death: घशामध्ये चॉकलेट अडल्यामुळे आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच या चिमुकल्याचा मृत्यू झाला.
Boy Death After Chocolate Stuck in His Throat
Boy Death After Chocolate Stuck in His ThroatSaam Tv

Delhi News: लहान मुलांना चॉकलेट (Chocolate) खायला खूप आवडते. अनेकदा ही मुलं चॉकलेटसाठी आई-वडिलांकडे हट्ट करतात. पण याच चॉकलेटने एका चिमुकल्याच्या घात केल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीमध्ये (Delhi) 4 वर्षांच्या मुलाचा चॉकलेटमुळे मृत्यू झाला आहे. घशामध्ये चॉकलेट अडल्यामुळे आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच या चिमुकल्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Boy Death After Chocolate Stuck in His Throat
JioMart Layoff: रिलायन्सच्या JioMart ने 1000 कर्मचाऱ्यांना दिला नारळ, आणखी लोकांवर कपातीची टांगती तलवार

मिळालेल्या माहितीनुसार, सानियाल असं या चिमुकल्या मुलाचे नाव आहे. रविवारी सानियाल आपल्या आजोबांसोबत घराबाहेर फिरण्यासाठी गेला होता. यावेळी त्यांनी आजोबांकडे चॉकलेटसाठी हट्ट केला. आपल्या लाडक्या नातवाचा हट्ट पूर्ण करण्यासाठी त्यांनी सानियालला चॉकलेट आणण्यासाठी पैसे दिले. पैसे घेऊन सानियालने दुकानातून चॉकलेट देखील खरेदी करुन आणले. पण याच चॉकलेटने त्याचा घात केला.

Boy Death After Chocolate Stuck in His Throat
WHO Chief Warn For Next Pandemic: कोरोनापेक्षा भयंकर महामारी येणार! WHO प्रमुखांनी दिला इशारा, 2 कोटी लोकांचा होऊ शकतो मृत्यू

सानियालने घरी आल्यानंतर चॉकलेटवरचा कागद फाडला आणि ते तोंडात टाकले. चॉकलेट खात असताना अचानक ते सानियालच्या घशामध्ये अडकले. त्यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. सानियालची अवस्था पाहून त्याच्या आई-वडिलांनी त्याला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले. घशामध्ये चॉकलेट अडकल्यामुळे सानियालला श्वास घेता येत नव्हते त्याचसोबत त्याला बोलताही येत नव्हते.

खूप वेदना होत असल्यामुळे सानियालच्या डोळ्यातून सतत अश्रू येत होते. सानियालवर डॉक्टरांनी तात्काळ उपचार सुरु केले. पण सानियालचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आपल्या मुलाचा डोळ्यासमोर जीव गेल्याचे पाहून त्याच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला. सानियाल हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. आपल्या लाडक्या मुलाला गमावल्यामुळे संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर लहान मुलांना चॉकलेट देताना आई-वडिलांनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले जात आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com