सेल्फीचा मोह जीवावर बेतला, शताब्दी एक्सप्रेसच्या धडकेत 4 तरुणाचा मृत्यू

घटनास्थळी दाखल झालेले जीआरपी पोलीस (Police) मृतांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.
सेल्फीचा मोह जीवावर बेतला, शताब्दी एक्सप्रेसच्या धडकेत 4 तरुणाचा मृत्यू
Gurugram NewsSaam Tv

दिल्ली - दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममध्ये (Gurugram) मंगळवारी संध्याकाळी सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात चार तरुणांचा शताब्दी एक्स्प्रेसच्या धडकेत मृत्यू झाला आहे. घटनास्थळी दाखल झालेले जीआरपी पोलीस (Police) मृतांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. बसई धनकोट रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला. (4 youths got hit by train while taking selfie)

हे देखील पहा -

मिळालेल्या माहितीनुसार, सराय रोहिल्लाहून अजमेरला जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेस (Express) दुपारी ४.४८ वाजता गुरुग्राम रेल्वे स्थानकातून निघाली होती. बसई धनकोट रेल्वे स्थानकाजवळ ट्रेन पोहोचली, तेव्हाच रेल्वे रुळावर सेल्फी घेत असलेले ४ तरुण एक्स्प्रेसच्या कचाट्यात आले. सर्व मित्र सेल्फी घेतण्यात इतके मग्न होते की ट्रेन आल्याचेही त्यांना कळले नाही.

Gurugram News
सोलापुरात एकाचवेळी निघाली 3 मित्रांची अंत्ययात्रा; राऊतांना भेटण्यासाठी जाताना घडली दुर्दैवी घटना

या अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की तरुणांच्या शरीराचे भाग ५०० मीटरपर्यंत विखुरलेले दिसले. माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेले जीआरपी अधिकारी रामफळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅक्टिव्हा स्कूटरचा नंबर आणि मोबाईल फोनच्या आधारे पोलीस चार तरुणांची ओळख पटवण्याचे प्रयत्न करत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com