Bihar: दारुची नशा जीवावर बेतली; 5 जणांचा बुडून मृत्यू
Bihar NewsSaamTv

Bihar: दारुची नशा जीवावर बेतली; 5 जणांचा बुडून मृत्यू

विषारी दारू पिल्यानंतर नालंदा जिल्ह्यातील सोहसराय पोलीस स्टेशन हद्दीतील छोटी पहारी आणि पहार तल्ली मोहल्ला येथे पाच जणांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. तर तीन जणांची प्राकृती गंभीर असून त्यांना गंभीर अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

बिहार - राज्यात दारूचे (Alcohol) उत्पादन, सेवन आणि विक्री यावर बंदी घालण्यात आली आहे. असे असले तरी राज्यात मात्र दारू तस्करी, मद्यपानाची अनेक प्रकरणे रोजच समोर येत आहेत. तर अनेक वेळा ही विषारी दारू प्यायल्याने अनेक लोकांचा मृत्यू (Death) देखील झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. असे असले तरीही लोकांचे दारू पिण्याचे प्रमाण काही केल्या कमी होताना दिसत नाही आहे. अशीच विषारी दारू पिल्यानंतर नशेत पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (5 people died due to the consumption of poisonous liquor)

प्राप्त माहितीनुसार, विषारी दारू पिल्यानंतर नालंदा जिल्ह्यातील सोहसराय पोलीस स्टेशन हद्दीतील छोटी पहारी आणि पहार तल्ली मोहल्ला येथे पाच जणांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. तर तीन जणांची प्राकृती गंभीर असून त्यांना गंभीर अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दारू पिऊन तब्येत बिघडल्यामुळे या ५ जणांचा मृत्यू झाल्याची बाब मृतांच्या नातेवाईकांनी उघडकीस केली आहे. बनावट दारू प्यायल्याने पाच जणांचा मृत्यू झाला याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.

Edited by - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com