24 तासांत 5 दहशतवाद्यांचा खात्मा
24 तासांत 5 दहशतवाद्यांचा खात्माSaam Tv

24 तासांत 5 दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर मधील सुरक्षा जवानांना मोठे यश मिळाले आहे.

नवी दिल्ली : जम्मू काश्मीर Jammu and Kashmir मधील सुरक्षा जवानांना मोठे यश मिळाले आहे. गेल्या २४ तासांमध्ये ५ दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा जवानांना यश आले आहे. सुरक्षा जवानांनी कुलगाम Kulgam व पुलवामा Pulwama येथील ३ वेगवेगळ्या ठिकाणी पार पडलेल्या चकमकींमध्ये या ५ दहशतवाद्यांचा खात्मा केल आहे. 5 terrorists killed in 24 hours

सुरक्षा जवानांना कुलगाम जिल्ह्यामधील झोदार Zodar परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची, माहिती मिळाली होती. यानंतर जवानांनी परिसर बंद करत सर्च ऑपरेशनद्वारे शोध घेण्यास सुरवात केली.

हे देखील पहा-

दरम्यान, हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर असलेला, बुरहान वाणीच्या मृत्यूला ५ वर्ष झाली आहेत. ८ जुलै २०१६ मध्ये कोकेरनाग Kokernag येथील बुराहान वाणीला मारण्यात आले होते. यानंतर प्रत्येक वर्षी दहशतवादी ८ जुलैला हल्ला करण्याच्या तयारीतच असतात. परंतु, असा काही हल्ला होण्याच्या अगोदरच सुरक्षा दलाने त्यांचा खात्मा केल आहे. 5 terrorists killed in 24 hours

 24 तासांत 5 दहशतवाद्यांचा खात्मा
भारतीय सैन्यानं उद्ध्वस्त केल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा 10 चौक्या

दरम्यान सुरक्षा दलाला दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यावर, शोध मोहिम सुरू करण्यात आली होती. या दरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करण्यात सुरू केली. यामधून चकमकीला सुरुवात झाली. या चकमकीत लष्कर- ए- तोयबाचे २ दहशतवादी ठार झाले आहेत.

दुसरीकडे पुलवामा येथील झालेल्या, चकमकीतमध्ये २ दहशतवादी व हंडवारा Handwara येथील १ दहशतावादी ठार करण्यात आले आहे. हिजबूलचा टॉप दहशतवादी मेहरजुद्दीन उर्फ उबैद हंडवारा येथील चकमकीत मारला गेला आहे. आतापर्यंत गेल्या २४ तासामध्ये एकूण ५ दहशतवादी ठार करण्यात आले आहेत. 5 terrorists killed in 24 hours

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com