
कर्जामुळे तोट्यात गेलेली अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स कॅपिटल (Reliance capital) विकत घेण्यासाठी 54 कंपन्यांनी बोली लावली आहे. यामध्ये टाटा एआयजी (TATA), जपानी कंपनी निप्पॉन लाइफ इन्शुरन्स, आयसीआयसीआय लोम्बार्ड, अदानी फिनसर्व्ह, एचडीएफसी अर्गो आणि इतर कंपन्यांचाही समावेश आहे. आरबीआय (RBI) नियुक्त प्रशासकाने बिड्स सादर करण्याची अंतिम तारीख 11 मार्च ते 25 मार्च पर्यंत वाढवली होती.
रिलायन्स कॅपिटलला (Reliance capital) खरेदी करण्यासाठी मोठ्या कंपन्यांनी उत्सुकता दाखवल्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये वाढ झाली आहे. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअरने (Share) 14 टक्क्यांनी झेप घेत 14.30 रुपयांपर्यंत मजल मारली आहे.
खरेदीसाठी या कंपन्याही स्पर्धेत
रिलायन्स कॅपिटल (Reliance capital) खरेदीसाठी येस बँक, बंधन फायनान्शियल होल्डिंग्ज, चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट, ओक ट्री कॅपिटल, ब्लॅकस्टोन, ब्रुकफील्ड, टीपीजी, केकेआर, पिरामल फायनान्स आणि पूनावाला फायनान्स यांचा समावेश आहे. या कंपन्यांनी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (EoI) सादर करण्यासाठी आणखी वेळ मागितला होता. रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षी 29 नोव्हेंबर रोजी रिलायन्स कॅपिटलवर कारवाई केली होती.
या बोलीसाठी दोन पर्याय देण्यात आले होते, ज्यामध्ये संपूर्ण रिलायन्स कॅपिटल (Reliance capital) विकत घेण्याऐवजी, त्याच्या एक किंवा दोन कंपन्या देखील खरेदी केल्या जाऊ शकतात. जनरल इन्शुरन्स, होम फायनान्स, अॅसेट कन्स्ट्रक्शन आणि कमर्शियल फायनान्स कंपनी या त्याच्या इतर कंपन्या आहेत.
रिलायन्स कॅपिटल (Reliance capital)ही देशातील तिसरी सर्वात मोठी नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी होती ज्याच्या विरोधात हे पाऊल उचलले आहे. गेल्या वर्षी 29 नोव्हेंबर रोजी रिझव्र्ह बँकेने (RBI) देणे चुकवल्याबद्दल तिचे संचालक मंडळ बरखास्त केले होते.
Edited By -Santosh kanmuse
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.