गुजरातमध्ये भीषण अपघात; लिफ्ट तुटल्याने ८ कामगारांचा मृत्यू

गुजरातच्या अहमदाबादमध्ये लिफ्ट तुटून मोठा अपघात झाला आहे.
Accident
AccidentSaam tv

अहमदाबाद: गुजरातच्या अहमदाबादमध्ये लिफ्ट तुटून मोठा अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेत मृत्यू झालेले आठही बांधकाम कामगार असल्याची माहिती पालिसांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

Accident
Bachchu Kadu Detained: आमदार बच्चू कडू यांना मुंबई पोलिसांनी घेतलं ताब्यात; काय आहे नेमकं प्रकरण?

याअगोदर जम्मू काश्मिरच्या पुंछ जिल्ह्यातही एका मिनीबसचा अपघात झाला. या अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर २७ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या बसमध्ये ३६ जण प्रवास करत होते.

Accident
Travel Recipes Ideas : अचानक ठरलेल्या प्रवासात 'हे' पदार्थ बनतील झटपट, रेसिपी एकदा पहा

जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आणि मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. त्यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. 'पुंछमधील सावजियान येथे झालेल्या अपघातात झालेल्या मृत्यूमुळे दु:ख झाले. जखमींना लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये देण्यात येणार आहेत. जखमींवर उपचार करण्याचे निर्देश पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, असं ट्विट सिन्हा यांनी केले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com