धक्कादायक! विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबामधील 6 जणांचा मृत्यू

मध्य प्रदेशमध्ये काळजाला चिंता काढणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबामधील ६ जणांचा विजेचा शॉक लागून, दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
धक्कादायक! विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबामधील 6 जणांचा मृत्यू
धक्कादायक! विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबामधील 6 जणांचा मृत्यूSaam Tv

नवी दिल्ली : मध्य प्रदेशमध्ये काळजाला चिंता काढणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबामधील ६ जणांचा विजेचा शॉक लागून, दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मध्य प्रदेशच्या छतरपूर Chatarpur जिल्ह्यामधील महुआ गावात ही घटना घडली आहे. 6 members of the same family die due to electric shock

या घटनेने महुआ गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात दाखल करून उपचार सुरु करण्यात आले आहे. महुआ गावामध्ये राहणारा एक तरुण पाण्याचा टँक सुरु करण्याकरिता पाण्याच्या मोठ्या टाकीत उतरल होत. पाण्याची टाकी मोठी असल्याने, त्याठिकाणी अंधार असल्याने, विजेची व्यवस्था करण्यात आली होती.

हे देखील पहा-

टँक सुरु करताना या तरुणाचा जोरदार विजेचा शॉक लागला. यामुळे तो जोरात ओरडत होता. त्याचा आवाज ऐकून घरामधील सर्वजण पाण्याच्या टाकीकडे धाव घेतले. त्याला वाचवण्यकरिता ते पाण्याच्या टाकीत उतरले. तरुणाला वाचवण्याच्या प्रयत्नात घरामधील सात जणांना विजेचा शॉक लागला आहे. शॉक लागल्यामुळे सहा जणांचा दुर्देवी जागीच मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. 6 members of the same family die due to electric shock

धक्कादायक! विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबामधील 6 जणांचा मृत्यू
विजेचा शॉक लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या तरुणाला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी माहिती दिली आहे. या घटनेत रमुआ अहिरवार (वय- ५५), हल्ली अहिरवार (वय- ३५), हल्लू अहिरवार (वय- २५), जगन अहिरवार (वय- २०), हल्ली अहिरवार (वय- ३०) आणि जगन अहिरवार (वय- २०) असे मृत्यू झालेले नावे आहेत. या सर्वांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहे. एकाच कुटुंबामधील सहा जणांचा मृत्यू झाल्याने, या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहे.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com