Terrorist Attack : दिल्लीत 6 दहशतवाद्यांना अटक

देशभरात सण आणि उत्सवाचे वातावरण असतानाच, दिल्लीत मोठी खळबळजनक घटना घडली
Terrorist Attack : दिल्लीत 6 दहशतवाद्यांना अटक
Terrorist Attack : दिल्लीत 6 दहशतवाद्यांना अटकSaam Tv

वृत्तसंस्था : देशभरात सण आणि उत्सवाचे वातावरण असतानाच, दिल्लीत delhi मोठी खळबळजनक घटना घडली आहे. दिल्ली पोलिसांच्या delhi police स्पेशल सेलने ६ जणांना अटक करण्यात आली आहे. यातील २ जण हे पाकिस्तानी Pakistan terrorists प्रशिक्षित दहशतवादी असल्याची माहिती यावेळी समोर आली आहे.

हे देखील पहा-

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ही धडाकेबाज मोठी कामगिरी केली आहे. स्पेशल सेल, यूपी एटीएस यांच्या बरोबर प्रयागराज या ठिकाणी छापा टाकण्यात आला आहे. यावेळी ६ जणांना अटक करण्यात आली आहे. प्रयागराज मधील करेली या भागात हे ६ दहशतवादी लपून बसले होते. या ६ जणांचा अंडरवर्ल्डशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. यात दोघांना पाकिस्तान या ठिकाणी ट्रेनिंग देण्यात आली आहे.

Terrorist Attack : दिल्लीत 6 दहशतवाद्यांना अटक
...म्हणून लसीथ मलिंगा ने केली निवृत्तीची घोषणा

दोघेही प्रशिक्षित आहेत. या सर्वांना कडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. पोलीस सूत्रांनकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व दशतवादी देशात वेगवेगळ्या ठिकाणी घातपात घडवण्याच्या तयारीत होते. या सर्वांना मोठा कट सुद्धा रचला होता. पण, वेळीच स्पेशल सेल आणि यूपी एटीएसने या सर्वांच्या चांगल्याच मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेमुळे सर्व तपास यंत्रणांना हायअलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com