अफगाणिस्तानच्या संघर्षात 69 दहशतवादी ठार
अफगाणिस्तानच्या संघर्षात 69 दहशतवादी ठारSaam Tv

अफगाणिस्तानच्या संघर्षात 69 दहशतवादी ठार

अफगाणिस्तानातील सुरक्षा दलांनी तालिबानच्या ताब्यात असलेल्या बडगिस प्रांताची राजधानी कला-ए-नव पुन्हा ताब्यात घेतली आहे.

अफगाणिस्तानातील सुरक्षा दलांनी तालिबानच्या ताब्यात असलेल्या बडगिस प्रांताची राजधानी कला-ए-नव पुन्हा ताब्यात घेतली आहे. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना तेथून हुसकावून लावले. शहर ताब्यात घेण्याच्या दरम्यान सुरक्षा दलांनी 69 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता, तर 23 जण जखमी झाले होते. प्रांतीय राजधानी ताब्यात घेण्यासाठी सुरक्षा दलांनी पूर्ण ताकद लावली होती. या कारवाईत सैन्य कमांडोसमवेत हवाई हल्लेही करण्यात आले. बुधवारी कला-ए-नव ला तालिबानी अतिरेक्यांनी ताब्यात घेतले.

स्थानिक माध्यामांच्या म्हणण्यानुसार संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते फवाद अहमद म्हणाले आहेत की आता कला-ए-नववर आपले पूर्ण नियंत्रण आहे. तालिबानकडून मोठ्या प्रमाणात दारूगोळाही सापडला आहे. पश्चिमी सुरक्षा अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की तालिबान्यांनी आतापर्यंत शंभर जिल्हे ताब्यात घेतले आहेत.

जो बायडन मांडणार मत

व्हाइट हाऊसचे प्रेस सचिव जेन सासाकी यांनी पत्रकारांना सांगितले की अध्यक्ष जो बायडन लवकरच अफगानिस्तानमधील सद्यस्थिती आणि भविष्यातील धोरणाबद्दल बोलू शकतील. यापूर्वी ते सुरक्षा अधिकाऱ्यांकडून ताज्या परिस्थितीची माहिती घेतील.

अफगान नागरिकांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन

ANIनुसार, काबूलमधील अमेरिकी दूतावासाचे उप दूताधिकारी रास विल्सन म्हणाले आहेत की तालिबान अफगाण नागरिकांवर हल्ला करून त्यांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन करीत आहे.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com