आठवड्यानंतर शासकीय कर्मचारी होणार मालामाल; माेदी सरकार घेणार माेठा निर्णय?

मार्चमध्ये सरकारने महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढवला होता. आता देखील कर्मचा-यांना फायदा हाेईल.
7th Pay Commission, Central Government
7th Pay Commission, Central Governmentsaam tv

नवी दिल्ली : केंद्र सरकार (Central Government) शासकीय कर्मचाऱ्यांना जूलै महिन्यात एक मोठी भेट देणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. या कर्मचार्‍यांना त्यांचा महागाई भत्त्याचा फरक (थकित डीए) मिळणार असल्याचे सूत्रांकडून समजते. त्याबाबतची अधिकृत घाेषणा अद्याप झालेली नाही. याबराेबरच कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. जानेवारी 2020 ते जून 2021 या कालावधीचा कर्मचाऱ्यांना अद्याप डीएचे पैसे मिळालेले नाहीत. त्यांनी थकीत रक्कम मिळावी यासाठी सातत्याने सरकारकडे मागणी केली हाेती.

कोविडमुळे (Covid) केंद्र सरकारने आराेग्य विभागावर जादा खर्च करीत कर्मचा-यांना भत्ता दिला नव्हता. गेल्या 18 महिन्यांचा भत्ता सरकार देण्याच्या विचारात असल्याचे बाेलले जात आहे.

सरकार दोन लाख रुपये देऊ शकते

सरकार कर्मचाऱ्यांच्या खात्यात एकदम दाेन लाख रुपये भरेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराच्या बॅंडनुसार डीएची थकबाकी मिळू शकणार आहे सरकारने डीएची थकबाकी दिली तर वर्ग एकच्या कर्मचार्‍यांची रक्कम 11880 ते 37000 रुपयांपर्यंत राहील.

7th Pay Commission, Central Government
वाराणसीतून आंध्रला निघालेल्या कारला अपघात; एक ठार, सात जखमी

DA वाढू शकतो

वाढती महागाई लक्षात घेता सरकार कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ करून कर्मचा-यांना दिलासा देईल अशी शक्यता आहे. सध्या कर्मचाऱ्यांना ३४ टक्के दराने डीए मिळत आहे. मार्चमध्ये सरकारने महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढवला होता. जुलै महिन्यात सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये ४ ते ५ टक्के वाढ करेल अशी शक्यता आहे. सरकारकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

कर्मचाऱ्यांना लाभ मिळेल

सरकारने कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये चार टक्क्यांनीही वाढ केल्यास ५० लाख कर्मचाऱ्यांना आणि ६५ लाख पेन्शनधारकांना याचा लाभ मिळेल. सरकारी कर्मचाऱ्यांना दिलेला डीए हा त्यांच्या आर्थिक सहाय्य वेतन संरचनेचा भाग आहे.

Edited By : Siddharth Latkar

7th Pay Commission, Central Government
संकट काळात परिवहन मंत्री स्वत: बनले नाविक; रुग्णास पाेहचविले दवाखान्यात (व्हिडिओ पाहा)
7th Pay Commission, Central Government
सात दिवसांसाठी 70 खोल्या बुक; खाण्यापिण्यासह एकनाथ शिंदेंचा दररोज हाेताेय इतका खर्च
7th Pay Commission, Central Government
व्हय की, ताेंड लपवणारा आमदार आपलाच ! एकनाथ शिंदेंचा व्हिडीओ व्हायरल; गावात चर्चाच चर्चा

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com