Telangana: भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू तर १७ जण गंभीर जखमी; पंतप्रधानांकडून मदत जाहीर

Telangana Road Accident News : भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला असून १७ जण गंभीर जखमी झाले आहेत.
Telangana: भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू तर १७ जण गंभीर जखमी; पंतप्रधानांकडून मदत जाहीर
Telangana Road Accident NewsTwitter/ @ANI

तेलंगाणा: तेलंगणातील कामारेड्डी जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला असून १७ जण गंभीर जखमी झाले आहेत. हसनपल्ली येथे रविवारी सायंकाळी लॉरी आणि मिनीव्हॅन यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने मोठी दुर्घटना (Accident) घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी या भीषण अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आणि मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) जारी केलेल्या निवेदनात अपघातात जखमी झालेल्यांना ५०,००० रुपयांची मदत जाहिर केली आहे. (9 killed 20 injured after speeding lorry hits auto in Kamareddy)

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार, मिनीव्हॅनमधील प्रवासी येल्लारेड्डी (Telangana) येथील एका कार्यक्रमातून परतत असताना निजामसागर झोनमधील हसनपल्ली गेट येथे हा अपघात झाला. लॉरीच्या चालकाने रस्त्याच्या कडेला चुकीची बाजू घेऊन विरुद्ध दिशेने येणाऱ्या मिनी ट्रकला धडक दिल्याने दोन जण जागीच ठार झाले तर इतर गंभीर जखमी झाले आहे.

या भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. यात अंजव्वा (35 वर्षे), वीरामणी (35 वर्षे), लचव्वा (60 वर्षे), सायव्वा (38 वर्षे), सायलू (35 वर्षे), इलाया (53 वर्षे), पोशैया (60 वर्षे), गंगाव्वा (45 वर्षे) आणि वीरव्वा (70 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. कामरेड्डीचे पोलीस अधीक्षक श्रीनिवास रेड्डी यांनी सांगितले की, "चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी लॉरी चालकाची ओळख पटली असून आम्ही त्याला लवकरच पकडू." असं ते म्हणाले आहेत.

Telangana Road Accident News
Crime: जयभीम चौकात दोन गट भिडले; १ युवक मृत्यूमुखी, २ जखमी, १० जणांवर गुन्हा दाखल

दरम्यान या भीषण अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. सोमवारी केलेल्या ट्वीटमधून त्यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना श्रद्धांजली वाहिली आहे. मोदींनी ट्वीट केलं की, तेलंगणातील कामारेड्डी जिल्ह्यात झालेल्या अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे दुःखी आहे. शोकाकुल कुटुंबियांसोबत संवेदना आणि जखमींसाठी प्रार्थना. मृतांच्या नातेवाईकांना PMNRF कडून प्रत्येकी 2 लाख रुपये दिले जातील. जखमींना 50,000 रुपयांची मदत दिली जाईल.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.