Delhi Kanjhawala Case: निर्दयीपणाचा कळस! दिल्ली प्रकरणात मोठा खुलासा; आरोपींनी 'या' गोष्टी केल्या कबूल

गाडी थांबवली असती तर आम्ही पकडले गेलो असतो म्हणून आम्ही गाडी थांबवली नाही, अशी कबुली आरोपींनी दिली आहे.
Delhi Kanjhawala Case
Delhi Kanjhawala CaseSaam tv

Delhi Kanjhawala Case: दिल्लीच्या कंझावाला प्रकरणात रोज नवीन माहिती समोर येत आहे. अटकेत असलेल्या आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. या चौकशी दरम्यान आरोपींनी तरुणी गाडीखाली असल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. गाडी खाली तरुणी होती हे आम्हाला माहीत होते. पण गाडी थांबवली असती तर आम्ही पकडले गेलो असतो म्हणून आम्ही गाडी थांबवली नाही, अशी कबुली आरोपींनी दिली आहे. (Delhi Kanjhawala Case Update)

३१ डिसेंबरच्या रात्री ही घटना घडली आहे. पीडितेचा अपघात होऊन कारच्या पाठीमागे तिचा पाय अडकला होता. ती मागे अडकली तेव्हा चारचाकी कार सुरू होती. शरीर फरपटत असल्याने ती जिवाच्या आकांताने आरडाओरडा करत गाडी थांबवण्यास सांगत होती मात्र नराधमांनी आणखीन वेगात तब्बल १२ किलोमिटरपर्यंत तिला फरपटत नेले. रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीने ही घटना पाहिली होती त्याने पोलिसांत याची तक्रार दाखल केली. अशात पोलिसांनी आरोपींना सुरुवातीला या बाबत विचारले असता कारमध्ये गाण्यांचा मोठा आवाज होता त्यामुळे आम्हाला काहीच एकू आलं नाही असं सांगितलं होतं.

Delhi Kanjhawala Case
Delhi Sultanpuri Case: दिल्ली कांझावाला प्रकरणाला नवं वळण; तरुणीचा अपघात की हत्या? 'त्या' व्हिडिओनंतर गूढ वाढलं

मात्र आता त्यांनी कबुली दिल्याचं सूत्रांकडून समजलं आहे. आम्ही कारमध्ये होतो तेव्हा माहीत होते की, ती गाडी खाली अडकली आहे. मात्र तिला काढायला गेलो असतो तर आम्हाला कुणी पाहिले असते आणि आम्ही पकडले गेलो असतो. त्यामुळे आम्ही काहीच केले नाही. आम्हाला वाटले की, नंतर तिचा मृतदेह अपोआप कारपासून वेगळा होईल, असे आरोपींनी कबुली देताना म्हटले आहे.

Delhi Kanjhawala Case
Delhi Weather : दिल्ली-एनसीआरमध्ये दाट धुके अन् थंडीची लाट; ऑरेंज अलर्ट जारी

या घटनेत कारमध्ये एकूण ५ जण बसले होते. पोलिसांत तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी या पाचही मुलांना अटक केली. यात त्यांना घटनास्थळावरून पळून जाण्यासाठी आणखीन दोन मुलांनी मदत केली होती. त्यांचा देखील शोध घेत दोघांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात दीपक खन्ना, कृष्ण, अमित खन्ना, मिथुन, आशुतोष अंकुश आणि मनोज मित्तल यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सध्या यातील पाच आरोपी पोलिसांच्या अटकेत आहेत. अंकुशला शनिवारी जामीन मंजूर करत सोडण्यात आले आहे. त्याच्यावर असलेले आरोप जामीनासाठी पात्र असल्याचे सांगत २० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अंकुशचा जामीन मंजूर झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com