बापरे! जिवंत बॉम्ब थेट सैनिकाच्या छातीत शिरला; ऑपरेशन करताना काय घडलं?

बॉम्ब थेट एका सैनिकाच्या छातीत गेला होता.
doctor
doctorsaam tv

Ukraine : एक बॉम्ब एकच वेळी हजारो लोकांचा जीव घेऊ शकतो. हे तर तुम्हाला माहीतच असेल. अशात बॉम्ब असं नाव जरी ऐकल तरी लोकांची धावपळ सुरू होते. अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्यात बॉम्ब असल्याच्या अफवेने मोठी चेंगराचेंगरी झाली आहे. यात काहींचा मृत्यू देखील झाला आहे. अशात विध्वंसक बॉम्ब पैकी एक बॉम्ब थेट एका सैनिकाच्या छातीत गेला होता. हा बॉम्ब बाहेर काढण्यासाठी डॉक्टरांना मोठी कसरत करावी लागली. आता हा बॉम्ब बाहेर निघाला की अनर्थ घडला हे माहीत करून घेऊ. (Latest soldier News)

बॉम्ब काढण्यासाठी डॉक्टरांना मोठी मेहनत घ्यावी लागली. मात्र एका सैनिकांसाठी हे काम करताना त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता जिवंत बॉम्ब सैनिकाच्या छातीतून बाहेर काढला. आता सोशल मीडियावर ही घटना व्हायरल होत आहे. सैनिकाच्या छातीत अडकलेला बॉम्ब हा एक ग्रेनेड बॉम्ब आहे.

doctor
Viral Video : भररस्त्यात शाळकरी मुलींमध्ये तुफान हाणामारी; एकमेकींच्या पार झिंज्या उपटल्या

हा बॉम्ब इतर बॉम्ब पेक्षा थोडा वेगळा असतो. यात ज्या ठिकाणी हा बॉम्ब फेकला जातो तिथे स्फोट होतो. मात्र या सैनिकाबरोबर हा चमत्कारिक प्रकार घडला आहे. शत्रूने सैनिकाच्या दिशेने बॉम्ब फेकला तेव्हा तो सैनिकाच्या छातीवर लागला. मात्र तो फुटण्याऐवजी थेट सैनिकाच्या छातीत शिरला. या घटनेने सर्वच जण चकित झाले. विशेष म्हणजे हा बॉम्ब छातीत जाऊन देखील फुटला नाही तो जिवंत राहिला.

doctor
Viral Video: मस्ती आली अंगाशी! चालू गाडीवरचं सुरू होता रोमान्स, पोलिसांनी घडवली अद्दल; Video Viral

सदर घटना युक्रेनमधील आहे. युक्रेन आणि रशियामध्ये असेलल्या युद्धात ही घटना घडली. या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. युक्रेनचे उपरक्षामंत्री हन्ना मालियार यांनी या घटनेची माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर ही माहिती दिली आहे. सैनिकाच्या छातीच्या पिंजऱ्याचा आणि त्यात असलेल्या जिवंत बॉम्बचा येकरे काढून त्यांनी हा फोटो पोस्ट केला आहे.

त्यांनी सैनिकावर झालेल्या शस्त्रक्रियेची देखील माहिती दिली. बॉम्ब काढण्यासाठी सैनिकाच्या शरीरात रक्तस्त्राव रोखून ठेवायचा होता. त्यामुळे डॉक्टरांनी सौम्य करंट सैनिकाच्या छातीत सोडले होते. त्यामुळे तेथील रक्त वाहिन्या काही प्रमाणत बंद राहिल्या. मात्र यामध्ये करंटमुळे जिवंत बॉम्ब फुटण्याची शक्यता होती. परंतु डॉक्टरांनी काळजीपूर्वक ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. ही घटना सध्या व्हायरल होतं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com