माकडाला वाचवण्याच्या प्रयत्नात कारचा भीषण अपघात! (पहा Video)

माकडाला वाचवण्यासाठी हिमाचल प्रदेशातील Himachal Pradesh शिमला Shimla येथून एका भीषण कार अपघाताचा व्हिडिओ Car Accident Video समोर आला आहे.
माकडाला वाचवण्याच्या प्रयत्नात कारचा भीषण अपघात! (पहा Video)
माकडाला वाचवण्याच्या प्रयत्नात कारचा भीषण अपघात! (पहा Video)Twitter/@ghazalimohammad

शिमला: माकडाला वाचवण्यासाठी हिमाचल प्रदेशातील Himachal Pradesh शिमला Shimla येथून एका भीषण कार अपघाताचा व्हिडिओ Car Accident Video समोर आला आहे. एका माकडाला वाचवण्याच्या प्रयत्नात एक कार रस्त्यावरुन कित्येक फूट खाली कोसळली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिमल्याच्या हॉटेल हिमलँडच्या पार्किंगमध्ये हा अपघात झालाआहे. हॉटेलमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात CCTV Camera या संपूर्ण अपघाताचा व्हिडिओ कैद झाला. व्हिडिओमध्ये दिसून येत असल्याप्रमाणे ही कार एलिव्हेटेड रोडवरून घसरुन खाली पार्किंगच्या जागेवर जोरात आदळली आहे. कारच्या समोर अचानक एक माकड आले होते आणि चालकाचे माकडाला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याच्या गाडीचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे.

माकडाला वाचवण्याच्या प्रयत्नात कारचा भीषण अपघात! (पहा Video)
Live : जळगाव DCC त महाविकास दोन जागांवर, १ अपक्ष विजयी

घटनेदरम्यान, तिथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी कार खाली पडल्याचे पहिले आणि कारमध्ये अडकलेल्या लोकांची मदत केली. गाडीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले. माहितीनुसार, कारमध्ये एकाच कुटुंबातील ३ जण होते, त्यात एका ४ वर्षांच्या मुलाचा समावेश होता. सुदैवाने, अपघातात कोणीही गंभीर जखमी झाले नाहीत. सर्वजण थोडक्यात बचावले ही कार दिल्लीहून रामपूरला जात होती.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com