Delhi: मोठा अनर्थ टळला! टेकऑफच्या तयारीत असलेल्या विमानाखाली अचानक आली कार, पाहा Video

Go First car goes under IndiGo plane Accident | सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
Go First car goes under IndiGo plane Accident
Go First car goes under IndiGo plane AccidentTwitter/@ANI

दिल्ली: दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा अनर्थ टळला आहे. टेकऑफच्या तयारीत असलेल्या एका विमानाखाली (Flight) अचानक कार आली. विमानाच्या पुढच्या चाकाजवळच्या भागात ही कार (Car Accident) धडकली, ज्यामुळे ही कार तिथेच अडकली. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, ही कार अचानक रवनेजवळ कशी आली याचा तपास आता केला जाणार आहे. दुपारी एक वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. (Go First car goes under IndiGo plane)

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या इंदिरा गांधी आतंरराष्ट्रीय विमानतळावर (Indiara Gandhi international Airport, Delhi) ही फ्लाईट इंडिगो एअरलाईन्सची होती, तर कार ही गो फर्स्ट गो या कंपनीची होती. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे. ए ३२० निओ ही फ्लाईट दिल्लीहून पाटण्याला उड्डाण घेणार होती. प्लाईट रनवेवर जाण्यासाठी तयार होती. मात्र, रनवेवर जाण्याआधीच ही स्विफ्ट डिझायर कार विमानाला धडकली.

Go First car goes under IndiGo plane Accident
लालूप्रसाद यादव यांना सीबीआय कोर्टाचा मोठा दिलासा; जाणून घ्या काय आहे प्रकरण

गो फर्स्ट गो एअरलाईन्सच्या ग्राऊंड स्टाफची एक कार थेट विमानतळावर उभ्या असलेल्या इंडिगो विमानाच्या (Indigo Airlines) पुढच्या चाकाखाली घुसली. क्रू मेंबर्स आणि पायलट यांना एअरपोर्टमधून बाहेर घेऊन जाण्यासाठी विमानतळावर असलेली कार टर्मिनल 2 वर उभ्या असलेल्या इंडिगो विमानाला धडकली. या घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी अचानक घडलेल्या या घटनेनं विमानतळावर एकच गोंधळ उडाला.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com