बांगलादेशात ज्यूस फॅक्टरीला आग ! 52 कामगार जळून खाक

बांगलादेशची राजधानी ढाकाच्या (Bangladesh Fire) हद्दीत असलेल्या एका कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत 52 लोक ठार झाले असून 50 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
बांगलादेशात ज्यूस फॅक्टरीला आग ! 52 कामगार जळून खाक
बांगलादेशात ज्यूस फॅक्टरीला आग ! 52 कामगार जळून खाकTwitter

बांगलादेशची राजधानी ढाकाच्या (Bangladesh Fire) हद्दीत असलेल्या एका कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत 52 लोक ठार झाले असून 50 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. वृत्तानुसार, इमारतीच्या तळ मजल्यावर आग लागली आणि रसायन आणि प्लास्टिकच्या बाटल्या यामुळे वेगाने पसरली. ही घटना गुरुवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास नारायणगंजमधील रूपगंजमधील शेजान जूस फॅक्टरीत घडली, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

'ढाका ट्रायब्यून' ने आपल्या अहवालात म्हटले आहे की या भीषण आगीतून बचाव करण्यासाठी अनेक कामगारांनी इमारतीतून उडी मारली .यापैकी काही मृत्यू पावले तर काही गंभीर जखमी झाले. वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, हॅशम फूड्स लिमिटेडच्या फॅक्टरी इमारतीत लागलेल्या आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अग्निशामक दलाच्या 18 गाड्या आल्या होत्या. बरेच लोक अजूनही बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. (A fire in Bangladesh has killed at least 52 people)

बांगलादेशात ज्यूस फॅक्टरीला आग ! 52 कामगार जळून खाक
देशात कोरोनानंतर आता या विषाणूचे संकट (पहा व्हिडिओ)

स्थानिक लोक त्यांच्या नातेवाईकांच्या शोधात घटनास्थळी जमले आहेत. आग लागल्यावेळी कारखान्याचे एक्झिट गेट बंद असल्याचा आरोप बचावलेल्या मजुर आणि त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. इमारतीत अग्निसुरक्षेची कोणतीही योग्य व्यवस्था केलेली नसल्याचा दावा कामगारांनी केला आहे. नारायणगंज जिल्हा अग्निशमन सेवेचे उपसंचालक अब्दुल्ला अल अरेफिन यांनी सांगितले की आग आटोक्यात येण्यास वेळ लागेल.

अग्निशामक विभागाचे उच्च अधिकारी असेही म्हणतात की जोपर्यंत आग पूर्णपणे नियंत्रित होत नाही तोपर्यंत या अपघातात किती जीवितहानी झाली हे सांगणे कठीण आहे. आगीचे कारण शोधण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने या घटनेच्या चौकशीसाठी पाच सदस्यांची समिती गठीत केली आहे. या घटनेत तीन महिला कर्मचाऱ्यांचे जळालेले मृतदेह आढळले आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com