Viral Video : 'पापाची परी' गाईसमोर स्टाइल मारायला गेली, घडलं भलतंच; लोटपोट हसाल!

व्हिडिओच्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन करण्याचं फॅड तरुणाईमध्ये दिवसेंदिवस वाढतच आहे.
Funny viral video
Funny viral videoSaam Tv

सोशल मीडियावर स्टार बनण्यासाठी कोणत्या ना कोणत्या व्हिडिओच्या (Viral Video) माध्यमातून लोकांचं मनोरंजन करण्याचं फॅड तरुणाईमध्ये दिवसेंदिवस वाढतच आहे. विशेषत: इन्स्टाग्रामवर रिल (Instagram Reels) बनवण्यासाठी तरुण-तरुणी भररस्त्यात व्हिडिओ काढताना दिसतात. एका तरुणीचा असाच एक भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. (Girl doing reels in front of cow funny video viral)

Funny viral video
Vedanta: 'गुवाहाटीतून सरकार आणलं, CM शिंदेंकडून 'वेदांता'च्या रुपात PM मोदींना रिटर्न गिफ्ट'

एक तरुणी रिल बनवण्याच्या धुंदीत असताना शेजारीच उभ्या असलेल्या गाईला मात्र तिचा हा अंदाज काही आवडला नाही. त्यानंतर जे घडलं ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. तरुणीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रिल बनवन असताना तरुणी ठुमके मारण्याचा प्रयत्न करते. पण त्याचवेळी गाय चांगलीच भडकते आणि तिच्या अंगावर धावून जाते. त्यानंतर ती तरुणी गाईला घाबरून धूम ठोकते.ही मजेशीर घटना कॅमेरात कैद झाली आहे. त्यामुळे पाहुयात हा मजेशीर व्हिडिओ.

रिल बनवणाऱ्या तरुणीने व्हिडिओ शेअर करून लिहिलं की, 'हे झालं शेवटी'. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमुळं प्रेक्षकांचं खूपच मनोरंजन झालं आहे. लोकं पोट धरून हसतील असा हा व्हिडिओ आहे. आतापर्यंत ४२ हजारहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केलं आहे. या व्हिडिओला कमेंटचाही पाऊस पडला आहे.

एका युजरने कमेंट करत लिहिलं की, तुम्ही गाईला कोणताच स्टेप नाही दिला, म्हणून गाय तुमच्यावर भडकली. दुसऱ्या युजरने म्हटलं, मला रिल बनवायला दे, असं कदाचीत गायला म्हणायचं असेल.आणखी एका युजरने कमेंट करत म्हटलं, देव सांगत आहे, आता तरी सुधरा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com