महागाईचा कहर ! एक किलो हिरव्या मिरच्यांसाठी मोजावे लागतायत तब्बल 710 रूपये

रोजच्या खाण्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या भाजीपाल्याच्या किंमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून एक किलो हिरव्या मिरच्यांसाठी (Chili) जवळपास ७१० रुपये मोजावे लागत आहेत.
महागाईचा कहर !  एक किलो हिरव्या मिरच्यांसाठी मोजावे लागतायत तब्बल 710 रूपये
महागाईचा कहर ! एक किलो हिरव्या मिरच्यांसाठी मोजावे लागतायत तब्बल 710 रूपये

मुंबई : आपल्या देशाचे शेजारचे राष्ट्र असणाऱ्या श्रीलंकेमध्ये महागाई गगणाला भिडली आहे. मागील काही दिवसांपमध्ये झालेल्या इंधन दरवाढीचे परिणाम सध्या श्रीलंकेत जाणवत असून श्रीलंकेतील नागरिकांना सध्या महागाईला सामोरं जावं लागत आहे. कारण दैनंदीन जीवनामध्ये गरजेच्या असणाऱ्या वस्तूंच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांवरती महागाईचं संकट ओढावलं आहे. श्रीलंकेतील Advocata Institute ने महागाई संदर्भातील आकडेवारी प्रसारीत केल्यानुसार, खाद्यपदार्थांच्या दरांमध्ये जवळपास 15 टक्के वाढ झाली आहे.

महागाईचा कहर !  एक किलो हिरव्या मिरच्यांसाठी मोजावे लागतायत तब्बल 710 रूपये
UP: तंदुरी रोटीवर थुंकून स्वयंपाक केल्याचा किळसवाणा प्रकार, Video व्हायरल!

Advocata Institute च्या अंतर्गत Bath Curry Indicator (BCI) हे खाद्य वस्तुंच्या बाबतीमधील महागाईचे आकडे जारी करत असते याच BCI नोव्हेंबर २०२१ ते डिसेंबर २०२१ पर्यंतची आकडेवारी जाहीर केली होती. त्यानुसार या कालावधीमध्ये जवळपास १५ टक्क्यांनी महागाईमध्ये वाढ झाल्याचे दिसून आलं आहे. आणि या महागाईमध्ये रोजच्या खाण्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या भाजीपाल्याच्या किंमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यानुसार श्रीलंकेमध्य़े (SriLanka) एक किलो हिरव्या मिरच्यांसाठी (Chili) जवळपास ७१० रुपये मोजावे लागत आहेत. या आकडेवाडीनुसार एकाच महिन्यात मिरच्यांच्या किंमतीमध्ये २८७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

हे देखील पहा -

मिरच्यांसोबतच (Chili) वांग्याच्या किंमतींमध्येही ५१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कांद्य़ांसह बटाट्याच्या किंमतीमध्ये देखील वाढ झाली असून एक किलोच्या बटाट्यासाठी २०० रुपये द्यावे लागत आहेत. दरम्यान आता केलेल्या सर्वेनुसार एका कुटुंबाला डिसेंबर महिन्यामध्ये आठवड्याच्या भाजीपाल्यासाठी ११६५ रुपये खर्च केले असतील, तर आता तेवढेच सामान खरेदी करण्यासाठी १५९३ रुपये द्यावे लागणार आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com