२३ लाखाचा काळा घोडा घेतला, घरी आणताच रंग बदलला...

एका व्यक्तीने २३ लाखाचा काळा घोडा खरेद केला आणि त्याला घरी आणून आंघोळ घातली असता त्याचा काळा रंग निघून गेला.
Black Horse
Black HorseSaam TV

चंदीगड : काळ्या रंगाचा घोडा (Black Horse) हा जातीवंत मानला जातो तसंच पुर्ण काळ्या रंगाचे घोडे तसे कमी प्रमाणात भेटतात. म्हणजे ते बाजारात दुर्मिळ असतात म्हणायला हरकत नाही. घोडे शौकीनांना काळ्या घोड्यांच खास आकर्षण असतं आणि ते या घोड्यांसाठी हवी तेवढी किंमत द्यायला तयार असतात.

मात्र, पंजाबमधील (Punjab) एका घोडे शौकीनाला काळा घोडा खरेदी करणं चांगलचं महागात पडलं आहे. कारण तब्बल २३ लाख रुपये खर्च करुन काळा घोडा विकत आणला आणि तो घरी आणताच तो काळा नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आजकाल बाजारामध्ये फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. फसवणूक करणारे कोणत्या थराला गेले आहेत याचं हे उदाहरण आहे. ते म्हणजे पंजाबमधील रहिवासी रमेश कुमार या व्यक्तीसोबत झालेली तब्बल २३ लाखांची फसवणूक.

हे देखील पाहा -

रमेशने एका व्यापाऱ्याकडून २३ लाख रुपयांचा काळा घोडा खरेद केला आणि त्याने या घोड्याला घरी आणून आंघोळ घातली. मात्र, घोड्याला आंघोळ घालताच काळ्या रंगाची धार वाहू लागली, व्यापाऱ्यांने लालसर तपकिरी (Reddish Brown) रंगाचा घोडा काळ्या रंगाचा म्हणून विकला असल्याचं यावेळी रमेशला कळालं तसंच आपली मोठी फसवणूक झाल्याचंही त्याच्या यावेळी लक्षात आलं. त्यामुळे घोड्याने खरा रंग दावताच मालकाचा चेहरा मात्र काळा पडला.

दरम्यान, या व्यवहारात रमेशने ७ लाख ६० हजार रुपयांची रोख रक्कम व्यापाऱ्यांना दिली होती. तर उरलेले पैसे चेक द्वारे व्यापाऱ्याला दिले. दरम्यान आपली फसवणून झाल्याचं समजताच रमेशने या व्यवहारामध्ये सामिल असणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलिस या आरोपींचा तपास करत आहेत.

Edited By - Jagdish patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com