
जयपूर: हवाई दलाचे लढाऊ विमान (Plane) मिग-21 हे राजस्थानच्या बाडमेरमध्ये कोसळले. या अपघातात (Accident) दोन वैमानिकांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मदत आणि बचाव पथके घटनास्थळी रवाना करण्यात आली. "भारतीय हवाई दलाचे दुहेरी आसनी मिग-21 ट्रेनर विमान आज संध्याकाळी राजस्थानमधील उत्तरलाई विमानतळावरून प्रशिक्षणासाठी उड्डाण करत होते. रात्री ९:१० च्या सुमारास हे विमान बारमेरजवळ कोसळले. ज्यामध्ये दोन्ही पायलटांचा मृत्यू झाला आहे. (MiG-21 crash News)
भारतीय वायु दलाने एक निवेदन जारी केले आहे. "भारतीय वायुसेनेतील विमानाला (Plane) झालेल्या अपघाताबद्दल (Accident) खेद वाटतो आणि शोकाकुल कुटुंबांसोबत खंबीरपणे उभे आहे." अपघाताचे कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.
हवाई दलाच्या मते, मिग-21 हे सोव्हिएत काळातील सिंगल-इंजिन मल्टीरोल फायटर/ग्राउंड अॅटॅक एअरक्राफ्ट आहे.
हवाई दलाने जारी केलेल्या अधिकृत माहितीनुसार, मिग-21 विमान नियमित प्रशिक्षणासाठी उड्डाणा करत होते. बाडमेरमधील उत्तरलाई एअर फोर्स स्टेशनवरून विमानाने उड्डाण केले होते. विमान बाडमेरच्या भीमडा गाव परिसरात पोहोचले तेव्हा त्या विमानाला आग लागली. विमानात दोन वैमानिक होते.
१९६० मध्ये भारत-चीन युद्धानंतर हे विमान (Plane) भारतीय हवाई दलात आले. २००६ मध्ये मिग-21 बायसन आवृत्तीमध्ये अपग्रेड करण्यात आले. अपग्रेडमध्ये शक्तिशाली मल्टी-मोड रडार, सुधारित एव्हियोनिक्स आणि कम्युनिकेशन सिस्टम समाविष्ट आहेत.
हे विमान राजस्थान येथील बाडमेर जिल्ह्यात कोसळले आहे. बाडमेरचे जिल्हाधिकारी लोक बंधू यांनी अपघाताची माहिती दिली. हे विमान बारडमेर जिल्ह्यातील भीमडा गावाजवळ कोसळले.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.