बीडच्या तरुणानं तुरुंगात बसून 5 देशातील लोकांना घातला कोट्यावधींचा गंडा

बीड येथील रहिवासी असणाऱ्या एका तरुणानं तुरुंगात बसून पाच देशातील नागरिकांना फसवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
बीडच्या तरुणानं तुरुंगात बसून 5 देशातील लोकांना घातला कोट्यावधींचा गंडा
बीडच्या तरुणानं तुरुंगात बसून 5 देशातील लोकांना घातला कोट्यावधींचा गंडाSaam TV

बीड : बीड येथील रहिवासी असणाऱ्या एका तरुणानं तुरुंगात बसून पाच देशातील नागरिकांना फसवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सायबर गुन्ह्याअंतर्गत शिक्षा भोगणाऱ्या तरुणानं विविध देशातील नागरिकांना कोट्यवधी रुपयांना फसवल्याची बाब उघड झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे संबंधित तरुणानं हा गुन्हा दोन तुरुंग अधिकारी आणि काही कर्मचाऱ्यांच्या दबावाखाली येवून केल्याचं प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठं हे रॅकेट समोर येण्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

बीडच्या तरुणानं तुरुंगात बसून 5 देशातील लोकांना घातला कोट्यावधींचा गंडा
Suneung Exam: जगातील सर्वात अवघड परीक्षा; 9 तास बसून सोडवावा लागतो पेपर

अमर अनंत अग्रवाल असं फसवणाऱ्या तरुणाचं नाव असून तो बीड येथील रहिवासी आहे. एका फसवणुकीच्या प्रकरणात संबंधित तरुण 2018 पासून मध्य प्रदेशातील भैरवगड कारागृहात शिक्षा भोगत आहे. संबंधित तरुण हॅकर असल्याने तुरुंगातील अधिकारी आणि काही कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर जबरदस्ती केली आणि हे काम करायला भाग पाडल्याचं पोलीस चौकशीत उघड झाले आहे.

यासाठी तुरुंगातील अधिकाऱ्यांनी आरोपीला क्रेडिट कार्ड्स आणि लॅपटॉप उपलब्ध करून दिला होता. याच्या आधारे आरोपीनं तुरुंगात बसून अनेकांना कोट्यवधी रुपयांचा फसवलं आहे. आरोपीनं परदेशातील लोकांची बँक खाती हॅक करून त्यातील रकमेची आफरातफर केली आहे. त्याने अनेक 5 स्टार हॉटेलांना देखील अशाच प्रकारे फसवले आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर, पोलिसांनी आरोपीला भोपाळ येथील तुरुंगात हलवलं आहे. अमर अग्रवाल याने ऑनलाइन फसवणूक करुन हे पैसे हवालाच्या माध्यमातून फिरवल्याचा संशय पोलिसांना आहे. यातील काही पैसे संबंधित जेलच्या अधिकाऱ्यांना मिळाले तर काही पैसे अमरने स्वतः साठी ठेवल्याचा संशय आहे. बीडमध्येही हवालाचे पैसे आल्याचा संशय पोलिसांना आहे. या अनुषंगाने पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com