Viral Video: देवाला तरी सोडा रे! देवपुजा करताना तरुणाने केला असा जुगाड, नेटकरी झाले थक्क

तंत्रज्ञानाचा अद्भूत उपयोग असा कॅप्शन देत हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
Viral Video Jugad News
Viral Video Jugad NewsSaamTv

Viral Video: सोशल मीडियावर आपल्याला नेहमीच एकापेक्षा एक जबरदस्त जुगाड केलेले पाहायला मिळतात. जे पाहून कधी पोटधरुन हसायला येते, तर कधी आश्चर्याचा धक्काही बसतो. असे खतरनाक जुगाड करणाऱ्यांची भारतातही काही कमी नाही.

सध्या अशाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काय केलाय या तरुणाने जबरदस्त जुगाड, चला जाणून घेवू. (Viral Video)

Viral Video Jugad News
Cow Hug Day: 14 फेब्रुवारीला 'काऊ हग डे' साजरा करा'; केंद्र सरकारचे आवाहन; जितेंद्र आव्हाडांनी केली टीका

सध्याचा काळ हा डिजीटल तंत्रज्ञानाचा आहे, त्यामुळे अनेक लोक बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करत आपली काम सोपी करत असतात. शिवाय मोबाईल म्हणजे तर जीवनातील एक अविभाज्य भागच झाला आहे.

लोकांना मोबाईलशिवाय राहणं कठिण झालं आहे. कारण मोबाईलद्वारे आपली अनेक काम होतात. पण सध्या एका तरुणाने आपल्या मोबाईलचा वापर अशा गोष्टीसाठी केला आहे. जे पाहून अनेकांना आपलं हसू आवरणं कठिण झालं आहे.

Viral Video Jugad News
Maharashtra Politics : राष्ट्रवादीची औरंगजेबाचा महाल दुरुस्त करण्याची मागणी; भाजपच्या बड्या नेत्याची आगपाखड, म्हणाले...

हा व्हिडिओ ट्विटरवर (Twitter) शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये एक तरुण देवाची पुजा करताना दिसत आहे. पुजा करता करता त्याच्या लक्षात येत की आपल्याकडे घंटी नाही. त्यावेळी या तरुणाने अशी काही शक्कल लढवली आहे, ज्यामुळे नेटकऱ्यांनीही त्याचे कौतुक केले आहे. शिवाय या तरुणाला तंत्रज्ञानाचा खरा वापर कसा करायचा हे समजलं असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.

व्हिडीओत एक तरुण जमिनीवर बसून पूजा करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर हा तरुण पूजा करत असताना ज्यावेळी घंटी वाजवण्याची वेळ येते त्यावेळी घंटी सापडत नाही. त्यामुळे तो लगेच शेजारी असलेला आपला मोबाईल घेतो आणि मोबाईलमधील बेल ऍप उघडून त्यामधील घंटानाद चालू करतो. त्यामुळे घंटा वाजत वाजत राहेते आणि तो तरुण आपली पूजा पार पाडतो.

या तरुणाच्या भन्नाट युक्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. "तंत्रज्ञानाचा अद्भूत उपयोग," असा कॅप्शन देत हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १५ हजारांहून अधिक व्ह्यूज आणि ६०० हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच शेकडो नेटकऱयांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका व्यक्तीने हे खूप आश्चर्यकारक आणि अविश्वसनीय असल्याचं म्हटलं आहे,

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com