Gold Silver Rate Today : सोन्याचा भाव पुन्हा वाढला, चांदीनेही घेतली उसळी; पटापट तपासा आजचे दर

Gold Price Today : जर तुम्ही सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर सोने चांदीचे भाव जाणून घेणे गरजेचे आहे.
Gold Silver Price 11 April 2023
Gold Silver Price 11 April 2023Saam TV

Gold Silver Price Today : गेल्या काही दिवसांपासून जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या दरात चढउतार होत आहे. त्यामुळे भारतीय बाजारपेठेत विक्रमी तेजी पाहायला मिळत आहे. त्यातच ऐन लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने अनेकांनी सोने खरेदीकडे कल केलाय. त्यामुळे सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. (Latest Marathi News)

Gold Silver Price 11 April 2023
Employee Salary : कंपनीची अजब ऑफर! कर्मचाऱ्यांना देणार 1 वर्षाचा पूर्ण पगार, पण ठेवली ही अट

आठवड्याच्या सुरूवातीपासूनच सोन्याच्या दरात विक्रमी तेजी पाहायला मिळत आहे. तर चांदीची किंमतही आतापर्यंतच्या विक्रमी उच्चांकावर व्यापार करत आहे. सोनं एक मौल्यवान धातू आहे आणि त्याचं मूल्य कालांतराने बदलत आहे. जर तुम्ही  सोने-चांदी (Gold And Silver Price) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर सोने चांदीचे भाव जाणून घेणे गरजेचे आहे.

आजचा सोन्याचा भाव काय?

आज मंगळवारी सराफा बाजारात पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. गुड रिटर्न्सनुसार आज २४ कॅरेट शुद्धतेच्या  सोन्याच्या (Gold Price) भावात ३३० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे २४ कॅरेट सोन्याचे दर प्रतितोळा ६० हजार ७६० रुपयांवर पोहचले आहेत.

चांदीच्या दरातही किंचित वाढ

दुसरीकडे सोन्याबरोबर चांदीच्या (Silver Price) दरातही आज किंचित वाढ झाली आहे. सोमवारी १ किलो चांदीचा दर ७ हजार ६३० रुपयांवर होता. आज त्यात ३० रुपयांची वाढ झाली असून भाव ७ हजार ६६० रुपयांवर पोहचला आहे.

Gold Silver Price 11 April 2023
WTC Final 2023 : सूर्यकुमार यादवचा पत्ता कट? टीम इंडियात अजिंक्य रहाणेची एन्ट्री होणार!

सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ होणार?

गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दराने मोठी उसळी घेतली आहे. त्यातच भारतात लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने दिवसागणिक थोडा का होईना, भाव वाढतच आहेत. दुसरीकडे शेअर बाजारात पडझड सुरू असल्याने अनेकांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने खरेदीला पसंती दिली आहे.

त्यामुळे येणाऱ्या काळात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ होऊ शकते असता अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. येत्या काळात चांदीचा दर ८०,००० रुपये प्रति किलो तर सोन्याचा भाव ६५,९९ रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

Edited by - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com