उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी 'आप'ची 150 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत.
उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी 'आप'ची 150 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी 'आप'ची 150 उमेदवारांची पहिली यादी जाहीरSaam TV

उत्तर प्रदेश: आम आदमी पार्टीने (AAP) रविवारी उत्तर प्रदेश विधानसभा (UP Assembly Election) निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. 'आप'च्या या यादीत 150 उमेदवारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. पक्षाने सर्व 403 जागा एकट्याने लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. यापूर्वी पक्षाने विधानसभा मतदारसंघातील प्रभारींची घोषणा केली होती. चांगलं कामं करणाऱ्यांसाठी तिकीट देण्यात येतील असे सांगण्यात आले होते. त्यापैकी अनेकांची नावे बदलण्यात आली आहेत. 'आप'च्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत फक्त आठ महिला आहेत.

उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी 'आप'ची 150 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
राज्यातील सर्वाधिक अपघात मुंबईत; वाचा तुमच्या जिल्ह्यातील आकडेवारी

आम आदमी पार्टीचे राज्यसभा सदस्य आणि यूपीचे प्रभारी संजय सिंह यांनी लखनौ येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले की, घाणेरडे राजकारण साफ करण्यासाठी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पक्षाच्या केंद्रीय संमतीने राज्यातील सर्व 403 विधानसभा जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी 150 जागांची पहिली यादी जाहीर झाली आहे. पात्र उमेदवार ज्यांच्या नावांवर केजरीवाल आणि केंद्रीय नेतृत्वाने सहमती दर्शवली आहे त्यात 8 एमबीए, 38 पदव्युत्तर, 4 डॉक्टर, 8 पीएचडी, 7 अभियंता, 8 बीएड, 39 पदवीधर आणि 6 पदविकाधारक आहेत. दुसरीकडे, जातींच्या बाबतीत 55 ओबीसी, 31 अनुसूचित जाती, 14 मुस्लिम, 6 कायस्थ आणि 36 ब्राह्मण आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. 10 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यात पश्चिम उत्तर प्रदेशातील 11 जिल्ह्यांतील 58 जागांसाठी, 14 फेब्रुवारीला दुसऱ्या टप्प्यात 9 जिल्ह्यांतील 55 जागांसाठी आणि तिसऱ्या टप्प्यात 20 फेब्रुवारीला 59 जागांसाठी मतदान होणार आहे. 16 जिल्ह्यांतील जागांसाठी मतदान होणार आहे. चौथ्या टप्प्यात 23 फेब्रुवारीला लखनौसह 9 जिल्ह्यांतील 60 जागांवर मतदान होणार आहे. पाचव्या टप्प्यात 27 फेब्रुवारीला 11 जिल्ह्यांतील 60 जागांसाठी, 3 मार्चला सहाव्या टप्प्यात 10 जिल्ह्यांतील 57 जागांसाठी आणि सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात 7 मार्चला 9 जिल्ह्यांतील 54 जागांसाठी मतदान होणार आहे. . 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com