IAFचे विंग कमांडर अभिनंदन यांना वीर चक्र प्रदान

बालाकोट एअरस्ट्राईकनंतर २७ फेब्रुवारी २०१९ दिवशी हवाई हल्ल्यामध्ये पाकिस्तानी F-१६ लढाऊ विमान पाडणारे ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांना आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते वीर चक्र प्रदान करण्यात आले
IAFचे विंग कमांडर अभिनंदन यांना वीर चक्र प्रदान
IAFचे विंग कमांडर अभिनंदन यांना वीर चक्र प्रदानSaam Tv

वृत्तसंस्था : भारतीय हवाई दलाकरिता आजचा दिवस खूप खास आहे. बालाकोट एअरस्ट्राईकनंतर Balakot Airstrike २७ फेब्रुवारी २०१९ दिवशी हवाई हल्ल्यामध्ये पाकिस्तानी F-१६ लढाऊ विमान पाडणारे ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान Abhinandan Varthaman यांना आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद Ramnath Kovind यांच्या हस्ते वीर चक्र प्रदान करण्यात आले आहे.

हे देखील पहा-

नायब सुभेदार सोमबीर यांना जम्मू आणि काश्मीर मधील कारवाईच्या दरम्यान A प्लस श्रेणीमधील दहशतवाद्याला ठार केल्याबद्दल मरणोत्तर शौर्य चक्र देऊन सन्मान करण्यात आला आहे. याशिवाय ५ दहशतवाद्यांचा खात्मा करणारे मेजर विभूती शंकर धौंडियाल यांना देखील मरणोत्तर शौर्य चक्र प्रदान करण्यात आले आहे. कॉर्प्स ऑफ इंजिनीअर्सचे सॅपर प्रकाश जाधव यांना मरणोत्तर कीर्ती चक्र, शांतता काळात दुसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे.

जाधव यांनी जम्मू- काश्मीरमध्ये कारवाईच्या दरम्यान दहशतवाद्यांना हुसकावून लावले होते. लष्कर कमांडर लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (निवृत्त), अभियंता- इन- चीफ लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग, दक्षिण नौदल कमांडर व्हाईस अॅडमिरल अनिल चावला यांना परम विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात येणार आहे. दुसरीकडे, ईस्टर्न एअर कमांडर एअर मार्शल दिलीप पटनायक यांना अति विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले आहे.

IAFचे विंग कमांडर अभिनंदन यांना वीर चक्र प्रदान
नगरच्या सुदर्शन कोतकरने पटकावला उत्तर महाराष्ट्र कुस्ती केसरी पुरस्कार

जम्मू- काश्मीरमध्ये २०१९ साली करण्यात आलेल्या पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले मेजर विभूती शंकर धौंडियाल यांच्या पत्नी नितिका कौल या २९ मे २०२१ भारतीय लष्करात दाखल झाले आहेत. नितिका भारतीय लष्करात लेफ्टनंट झाले आहेत. नितिका यांनी २९ मे दिवशी भारतीय लष्कराचा गणवेश परिधान करत शहीद मेजर विभूती शंकर यांना श्रद्धांजली वाहिली होती. १७ फेब्रुवारी २०१९ दिवशी दहशतवादी हल्ल्यामध्ये मेजर विभूती शंकर धौंडियाल हे शहीद झाले होते.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com