संतापजनक ! दोन मैत्रिणींना वही देण्याच्या बहाण्याने बोलावले घरी; अन्...

शाळेत प्रॅक्टिकलचे नोट्स देण्याच्या बहाण्याने २ अल्पवयीन मुलीना घरी बोलावून त्यांच्यावर दोघांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली
संतापजनक ! दोन मैत्रिणींना वही देण्याच्या बहाण्याने बोलावले घरी; अन्...
संतापजनक ! दोन मैत्रिणींना वही देण्याच्या बहाण्याने बोलावले घरी; अन्... Saam Tv

वृत्तसंस्था : शाळेत प्रॅक्टिकलचे नोट्स देण्याच्या बहाण्याने २ अल्पवयीन मुलीना घरी बोलावून त्यांच्यावर दोघांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. मुलींच्या वर्गामध्ये असलेल्या एका मुलाला पाठवून या नराधमांनी मुलींना प्रॅक्टिकलची वही देण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर या मुली त्यांच्या घरी आल्या. त्यावेळी दरवाजा बंद करत दोघांनी त्यांच्यावर अत्याचार करण्यात आला आहे.

हे देखील पहा-

बिहारमधील अकबरपूर परिसरामधील २ अल्पवयीन मुलींवर २ तरुणांनी अत्याचार केल्याचे स्पष्ट झाले आहे. मोहम्मद रियान नावाचा अल्पवयीन तरुण या तरुणींच्या घराजवळच राहत होता. त्याने या दोघींना भेटून प्रॅक्टिकलच्या नोट्स असल्याचा निरोप दिला आणि मित्राच्या घरी येऊन त्याना घेऊन जायला सांगितले होते. त्यानंतर त्या नोट्स घेण्याकरिता दोन्ही तरुणी दिलेल्या पत्त्यावर पोहोचले. दोघीही घरात पोहोचताच बाहेरून दार लावून २ तरुणांनी त्या दोघींवर बलात्कार केला आहे.

संतापजनक ! दोन मैत्रिणींना वही देण्याच्या बहाण्याने बोलावले घरी; अन्...
ऐकाव ते नवलच ! बीड मधील प्रेमी युगलांचा शोले स्टाईल 'ड्रामा'; पुढे घडले असं काहीतरी...

या घटनेविषयी बाहेर कोणाला सांगितले तर जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. त्यानंतर भांबावलेल्या अवस्थेत घरी आलेल्या मुलींनी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या अमानवी घटनेमुळे दोन्ही मुलींना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी दोघांविरुद्ध बलात्काराचा आणि तिसऱ्या तरुणाविरुद्ध दोघांना साथ दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांपैकी दोघांना अटक करण्यात आली आहे.

तिसरा आरोपी फरार झाला आहे. लवकरच तिसऱ्या आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात येणार आहे, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. या घटनेमुळे गावात सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. आरोपी तरुणांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली आहे. काही तरुणांच्या दुष्कृत्यामुळे पूर्ण गाव बदनाम होत असून, अशा विकृतींना वेळीच धडा शिकवण्याची गरज असल्याचे मत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com