5 स्टार हॉटेलच्या शौचालयात महिलेवर बलात्कार; प्रकरण दाबण्यासाठी पैशाचं आमिष

आरोपी हा बड्या घरातील असून हे प्रकरण दाबण्यासाठी आरोपीच्या वडिलांनी मुलीला पैशांचं आमिष दाखवलं.
5 स्टार हॉटेलच्या शौचालयात महिलेवर बलात्कार; प्रकरण दाबण्यासाठी पैशाचं आमिष
CrimeSaam TV

उत्तराखंड : देहरादून (Dehradun) येथील एका पंचताराकींत हॉटेलमध्ये २४ वर्षीय मुलीवरती बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलगी हॉटेलमध्ये हाउसकीपिंग विभागात कार्यरत होती. शिवाच मुलीवरती अत्याचार करणारा आरोपी हा बड्या घरातील असून हे प्रकरण दाबण्यासाठी आरोपीच्या वडिलांनी मुलीला पैशाचं आमिष दाखवलं होतं.

पीडित महिला तिच्या पतीसोबत देहरादून येथे राहते. हॉटेलमध्ये (Hotel) ती काम करत असताना सदर आरोपीने हॉटेलमधील शौचालयातच तिच्यावरती बलात्कार केला. दरम्यान, आरोपीच्या वडिलांनी हे प्रकरण दाबण्यासाठी पीडितेला पैशाचे आमिष दाखवलं. मात्र, महिलेने पोलिसांकडे (Police) तक्रार दाखल केली असता आरोपीला कलम ३७६ अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या शशि पुरोहित या पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना सोमवारी सकाळी घडली. ज्यावेळी पीडित महिला हॉटेलमधील वॉशरुममध्ये (Washroom) आपला मोबाईल चार्ज करत होती, त्यावेळी आरोपी आतमध्ये गेला, त्यावेळी महिलेने आपण महिला वॉशरुममध्ये येऊ शकत नाही असं सांगितलं.

हे देखील पाहा -

मात्र, आरोपीने महिलेवर जबरदस्ती करायला सुरुवात केली आणि वॉशरुममध्येच बलात्कार केला. दरवाचा बंद असल्यामुळे तिने केलेला आरडाओरडा बाहेर ऐकू गेला नाही. असं पोलिसांनी सांगितलं.

दरम्यान, सदर महिलेच्या मेडिकल रिपोर्टमध्ये तिच्यावरती बलात्कार झाल्याचं स्पष्ट झाल्यामुळे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा आरोपी अल्पवयीन असून पोलिसांनी त्यांचा धाक दाखवताच त्याने आपला गुन्हा कबुल केला आहे. शिवाय सदर आरोपी खूप घाबरलेला होता, सतत रडत आपल्याकडून चुक झाल्याचं कबुल केल्यामुळे त्याला बालसुधारगृहामध्ये पाठवण्यात आलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com