Accident News: भरधाव टँकरची रिक्षाला जोरदार धडक, 9 जणांचा जागीच मृत्यू, 1 जखमी

Uttar Pradesh Accident News: ऑटोमधील सर्व प्रवासी घाटमपूरहून जहानाबादला जात होते.
Accident News
Accident NewsSaam tv

UP Accident News: उत्तर प्रदेशातील फतेहपूरमध्ये झालेल्या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे तर एक जण लहान मुलगा गंभीर जखमी आहे. भरधाव टँकरने रिक्षाला दिलेल्या जोरदार धडकेमुळे हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, ऑटोमधील सर्व प्रवासी घाटमपूरहून जहानाबादला जात होते. दरम्यान जेहानाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिली मोड येथे एका भरधाव टँकरने रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की रिक्षाचा अक्षरश: चक्काचूर झाला.

Accident News
Latur Accident News: भरधाव ट्रकने दुचाकीला उडवलं; आईचा जागीच मृत्यू, वेळेवर मदत न मिळाल्याने मुलानेही सोडला जीव!

अपघाताची  (Accident)  माहिती मिळाल्यानंतर पोलीसह घटनास्थळी दाखल झाले आणि बजावकार्य सुरु केले. अपघातात 9 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 1 बालक गंभीर जखमी झाला. जखमी लहान मुलाला जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

टँकर चालक फरार

मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही. रिक्षाला धडक दिल्यानंतर टँकर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. पोलीस टँकरचा शोध घेत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांना जखमींवर योग्य ते उपचार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. (Breaking Marathi News)

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं ट्वीट

योगी आदित्यनाथ यांना आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, फतेहपूर जिल्ह्यात झालेल्या रस्ते अपघातात झालेली जीवितहानी अत्यंत दुःखद आहे. माझ्या संवेदना मृतांच्या कुटुंबांसोबत आहेत. जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. जखमी लवकरात लवकर बरे होवोत ही प्रार्थना.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com