Bihar: सुशांत सिंह राजपूतच्या ५ नातेवाईकांचा अपघाती मृत्यू

बिहारमधील जमुई या ठिकाणी भीषण अपघात झाला आहे. यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
Bihar: सुशांत सिंह राजपूतच्या ५ नातेवाईकांचा अपघाती मृत्यू
Bihar: सुशांत सिंह राजपूतच्या ५ नातेवाईकांचा अपघाती मृत्यूSaam Tv

वृत्तसंस्था : बिहारमधील जमुई या ठिकाणी भीषण अपघात झाला आहे. यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. सिकंदरा जवळच्या हलसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला आहे. ट्रक आणि सुमो व्हिक्टा यांच्यामध्ये झालेली ही धडक इतकी भीषण होती की अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.

याविषयी मिळालेल्या माहितीनुसार, सिकंदरा शेखपूर मार्गावर असलेल्या पिपरा गावाजवळ हा अपघात झाला आहे. लालजीत सिंह यांच्या पत्नीच्या अंत्यसंस्काराकरिता ते सर्वजण गेले होते. मृतांपैकी ५ जण हे जमुईतील नौडीहा या ठिकाणचे तर १ जण हा चौहान जी भागातला आहे. अंत्यसंस्कार करून परत येत असतानाच हा अपघात झाला आहे.

हे देखील पहा-

मृतांमध्ये ५ जण हे दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे नातेवाईक होते अशी माहिती आता समोर आली आहे. सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीच्या पतीच्या कुटुंबामधील नातेवाईकांचा मृतांमध्ये समावेश आहे. एडीजी ओमप्रकाश सिंह यांचे नातेवाईक असलेले लालजीत सिंह आणि त्यांच्या कुटुंबात ५ सदस्य अपघातात जागीच ठार झाले आहेत.

Bihar: सुशांत सिंह राजपूतच्या ५ नातेवाईकांचा अपघाती मृत्यू
मोफत रेशन धान्य वितरणाचा विस्तार होणार नाही; गरिबांना मोफत धान्य देण्याची योजना आता बंद होणार

ट्रक आणि सुमो यांची समोरासमोर धडक झाली आहे. या धडकेत जागेवरच ६ जण ठार झाले आहेत. अपघातात गंभीर जखमी झालेल्या ४ जणांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी झाली होती. सध्या या अपघाताची नोंद पोलिसात झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत. मृत आणि जखमींच्या कुटुंबियांना या अपघाताची माहिती देण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com