अदानी ग्रुपची सिमेंट उद्योगात एन्ट्री; Holcim India सोबत 10.5 अब्ज डॉलर्सची डील

गेल्या काही वर्षात अदानी ग्रुपने अनेक उद्योगात आपला डंका वाजवला आहे.
Adani Group And Holcim India
Adani Group And Holcim IndiaSaam TV

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या ग्रुपने आता सिंमेट उद्योगात पाऊल टाकले आहे. त्यांनी रविवारी जाहीर केले होते की त्यांनी भारतातील Holcim Ltd. चे स्टेक विकत घेण्यासाठी करार केला आहे. आता अदानी ग्रुपने या कराराची शर्यत जिकंली आहे. हा करार 10.5 अब्ज डॉलर म्हणजेच 81 हजार कोटींमध्ये झाला आहे. या करारामुळे अदानी ग्रुपने आता पोर्ट, ऊर्जा क्षेत्रात आपला प्रभाव टाकल्यानंतर सिमेंट क्षेत्रातही प्रवेश केला आहे. (Adani Group and Holcim India Deal)

गेल्या काही वर्षांमध्ये, अदानी समूहाने पोर्ट ऑपरेशन्स, पॉवर प्लांट्स आणि कोळसा खाणींपासून ते विमानतळ, डेटा सेंटर्स आणि स्वच्छ ऊर्जा या मुख्य व्यवसायाचा विस्तार केला आहे. अदानी ग्रुपने गेल्या वर्षी दोन सिमेंट उपकंपन्या सुरू केल्या होत्या. अदानी सिमेंटेशन लिमिटेड आणि अदानी सिमेंट लिमिटेड या दोन उपकंपन्या होत्या. यापैकी अदानी सिमेंटेशन लिमिटेड गुजरातमधील दहेज आणि महाराष्ट्रातील रायगड येथे दोन सिमेंट युनिट्स बांधण्याचा विचार करत होती.

देशातील दुसरा सर्वात मोठा सिमेंट उत्पादक होणार

या करारामुळे गौतम अदानी यांचा ग्रुप देशांतर्गत सिमेंट क्षेत्रातील दुसरा सर्वात मोठा ग्रुप बनणार आहे. त्यांनी होल्सीम, एसीसी लिमिटेड आणि अंबुजा सिमेंट या दोन भारतीय कंपन्यांचे नियंत्रण मिळवले आहे. हा महत्त्वाचा करार देशातील पायाभूत आणि साहित्य क्षेत्रातील सर्वात मोठा अधिग्रहण असल्याचे बोलले जात आहे. याच करारासंदर्भात गौतम अदानी गेल्या आठवड्यात अबुधाबी आणि लंडनला गेले होते.

Holcim ही स्वित्झर्लंड-आधारित बांधकाम साहित्य निर्माण करणारी कंपनी आहे. या कराराबाबत गौतम अदानी म्हणाले की, होल्सीमच्या सिमेंट कंपन्यांशी आम्ही ग्रीन एनर्जी आणि लॉजिस्टिक्समध्ये सामील होऊन जगातील सर्वात मोठी ग्रीन सिमेंट कंपनी बनवण्यासाठी प्रयत्न करु.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com