
नवी दिल्ली: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नावाचा उल्लेख करताना अपशब्द वापरल्यानं काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी वादाच्या भोवऱ्यात सापडले. भाजपने यावर संताप व्यक्त केला आहे. अधीर रंजन चौधरी आणि काँग्रेसवर भाजपने हल्लाबोल केला. तर, याबाबत स्वतः अधीर रंजन चौधरी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. शब्दोच्चार करताना चूक झाली, असं चौधरी यांनी म्हटलं आहे. (Adhir Ranjan Chowdhury Latest News)
अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) म्हणाले की, भाजपकडून विनाकारण या प्रकरणाला वेगळं वळण दिलं जात आहे. वाद उत्पन्न केला जात आहे. भाजप अशा पद्धतीने 'मसाला' शोधण्याचं काम करत आहे. कारण त्यांच्याकडे कोणता मुद्दाच नाही. माझ्याकडून चुकून तसा शब्दोच्चार झाला होता, असं मी कालच माध्यमांसमोर स्पष्ट केले आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान, अधीर रंजन चौधरी यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला असून, भाजप (BJP) याबाबत सोनिया गांधीकडेही उत्तर मागत आहे. त्यावर अधीर रंजन चौधरी यांनी यापूर्वीच यावर माफी मागितली आहे, असं काँग्रेसच्या (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) म्हणाल्या.
मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, ही व्याकरणदृष्ट्या झालेली चूक
काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी अधीर रंजन चौधरी यांच्या वक्तव्याबाबत सांगितलं की, त्यांच्याकडून व्याकरणदृष्ट्या चूक झालेली आहे. त्यांनी जाणीवपूर्वक असे वक्तव्य केलेले नाही. त्यांच्या भाषेत काही चूक झाली असेल, तर अशा प्रकारे मोठा गोंधळ घालणे योग्य नाही. हे त्यांनी जाणीवपूर्वक म्हटलं आहे की शब्दोच्चार करताना चुकीचा झाला हे बघितलं पाहिजे. तुम्ही आधी महागाई, अग्निपथ या मुद्द्यांची उत्तरे द्या, असेही खरगे म्हणाले.
दोन्ही सभागृहांचं कामकाज स्थगित
काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्या या वक्तव्यावरून लोकसभेत (Loksabha) मोठा गदारोळ केला. संसदेत (Parliament Session) केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. देशातील गरीब आणि आदिवासी समाजातील नागरिकांची अधीर रंजन चौधरी आणि काँग्रेसने माफी मागावी, असे त्या म्हणाल्या. दोन्ही सभागृहांत गदारोळ झाल्याने कामकाज स्थगित करण्यात आले.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.