आदित्य कोंडमूरची गिनीज बुकात उत्तुंग झेप, कमी वयात 'कार्ड थ्रोईंग'चा विक्रम करणारा पहिला भारतीय

सोलापूरच्या एका तरुणाची 'कार्ड थ्रोईंग'मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आलीय.
Aditya kondmur Guinness World Records
Aditya kondmur Guinness World Recordssaam tv

सोलापूर : येथील एका तरुणाची 'कार्ड थ्रोईंग'मध्ये (Card Throwing) गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आलीय. आदित्य कोंडमूर असं या तरुणाचं नाव असून त्याच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. सोलापूल शहरातील अशोक चौकात राहणाऱ्या आदित्यने कार्ड थ्रोईंगमध्ये अप्रतिम कामगिरी केल्यामुळं त्याच्या कुटुंबातील सदस्यांना आनंदाचा पारावरच उरला नाहीय. एकाच वेळी २५ कार्ड अचूकपणे फेकण्याचा विक्रम आदित्यनं केला आहे.

Aditya kondmur Guinness World Records
नुपूर शर्मा यांच्या अडचणी वाढल्या ; बीडमध्ये गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य कोंडमूरला (Aditya Kondmur) बालपणापासूनच जादूचे आकर्षण होते. आदित्यने त्याच्या मामाकडून जादुच्या कलेचं प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर यू ट्यूबच्या माध्यमातून पत्त्यांनी (खेळण्याच्या पत्त्यातील कागदी पत्ता)काकडीचे दोन तुकडे करणारा व्हिडिओ त्याने पाहिला. त्यानंतर आदित्यला या कलेबाबत आश्चर्य वाटलं. आदित्यने त्या अमेरिकेतील कलाकाराला फोन लावून या कलेबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने त्याच्या नावावर हा विक्रम असल्याचं आदित्यला सांगितलं. त्यानंतर कार्ड थ्रोईंग कलेबाबत आदित्यनं सराव सुरु केला.

आदित्यने केलेल्या मेहनतीला अखेर यश मिळाले असून त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये (Guinness book of records) करण्यात आलीय. आदित्यने जून २०२० मध्ये विक्रम नोंदवण्यासाठी गिनीज बुककडे नोंदणी केली होती. त्यानंतर फेब्रूवारी २०२१ मध्ये त्याने विक्रम नोंदवण्याचा पहिला प्रयत्न केला. पण एका तांत्रिक अडचणीमुळं आदित्यला तेव्हा विक्रम करता आला नाही. त्यानंतर त्याने पुन्हा नोंदणी केली.

Aditya kondmur Guinness World Records
Test Cricket Ranking: कसोटी क्रमवारीत 'या' क्रिकेटपटूचा जलवा, कोहली, रोहित कुठंय?

दरम्यान, यावेळी आदित्यने ११७ कार्ड अचूक ठिकाणी टार्गेटवर फेकून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद केली. विशेष म्हणजे ११७ कार्ड अचूक ठिकाणी फेकून पूर्वीचा २५ कार्ड फेकण्याचा विक्रम आदित्यने मोडला आहे. त्याच्या या विक्रमासाठी पंच म्हणून ॲड.मंजूनाथ कक्कळमेली व ज्योत्स्ना भट्टड यांनी काम पाहिले.त्यानंतर सहा महिन्यांनी म्हणजे जूनमध्ये त्याला गिनिज बूक ऑफ रेकार्डसने विक्रमाचे प्रमाणपत्र दिले.

- वैयक्तिक प्रकारात गिनीज बुकमध्ये स्थान मिळवणारा आदित्य कोंडमूर एकमेव

- सर्वात कमी वयात गिनीज बुकमध्ये स्थान मिळवणारा पहिला भारतीय

- जादूच्या क्षेत्रात गिनीज बुकमध्ये यश मिळवणारा पहिला जादूगार

Edited by - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com