
Aditya Thackeray Meets Arvind Kejriwal : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी रविवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उद्धण आलं आहे.
या दोन्ही नेत्यांमधील भेटीचं नेमकं कारण काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. राज्यात आम आदमी पक्ष आणि ठाकरे गट एकत्र येणार का? अशी शक्यताही काही राजकीय तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या भेटीचे फोटो ट्विटरवर पोस्ट केले आहेत. त्यांनी ट्वीट करत लिहिलं आहे की, ''मला आज माझ्या निवासस्थानी आदित्य ठाकरे यांची मेजवानी करण्याची संधी मिळाली. सध्याच्या राजकीय घडामोडींवर मी त्यांच्याशी सविस्तर संवाद साधला.'' या बैठकीला आदित्य ठाकरेंसोबत ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी आणि आपचे खासदार संजय सिंह उपस्थित होते. (Latest Marathi News)
कर्नाटकात काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. याच्या एका दिवसानंतर दोन्ही नेत्यांची भेट झाली. या बैठकीतून अनेक अर्थ काढले जात आहेत. महाराष्ट्रात पंजाबी मतदारांची संख्याही बऱ्यापैकी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अरविंद केजरीवाल यांची ठाकरे गटाला मदत होऊ शकते, असं बोललं जात आहे. मात्र या भेटीमागचं खरं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत की, ''मोदी लाट संपली आणि आता आमची लाट देशभर येत आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू झाली असून आज शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावण्यात आली असून या बैठकीत 2024 च्या निवडणुकीबाबत चर्चा करून तयारीला सुरुवात होणार आहे.''
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.