अजबच! लाइव्ह न्यूज मध्येच 'Adult Video' गेला ऑन एअर आणि...

अमेरिकेतील एका वृत्तवाहिनीवरून घडलेली घटना चर्चेचा विषय बनली आहे.
अजबच! लाइव्ह न्यूज मध्येच 'Adult Video' गेला ऑन एअर आणि...
अजबच! लाइव्ह न्यूज मध्येच 'Adult Video' गेला ऑन एअर आणि...Saam Tv

कोरोनामुळे जगासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. कोरोनामुळे ऑनलाइन माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरु झाला आहे. मुलांचे शिक्षणही ऑनलाईन झाले होते. कार्यालय बैठकाही ऑनलाइन होऊ लागल्या आहेत. पण या ऑनलाईन माध्यमांमुळे अनेकदा काही घटना घडल्या ज्या प्रत्येकासाठी चर्चेचा विषय बनल्या. आता अमेरिकेतील American News Channel एका वृत्तवाहिनीवरून घडलेली घटना चर्चेचा विषय बनली आहे.

घडलं असं की, जेव्हा अमेरिकेत एक महिला न्यूज अँकर हवामान अपडेट देत होती, तेव्हा अशी एक घटना घडली आहे की ज्यामुळे खळबळ उडाली आहे. अँकर हवामान अपडेट देत असताना अचानक एक अश्लील व्हिडिओ (Porn Video) स्क्रीनवर सुरु झाला. परंतु ही गोष्ट अँकरला माहितचं नव्हती, ती तसेच बातम्या सांगत होती. पण काही वेळाने कोणाचेतरी लक्ष स्क्रीनकडे गेले असावे आणि तेव्हा तो व्हिडिओ बंद झाला. पण तोपर्यंत हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

वृत्तसंस्थेनुसार, अँकर न्यूजवर हवामान अपडेट देत होती. पण नंतर तिच्या मागे पडद्यावर एक अश्लील व्हिडिओ सुरु झाला. तिच्या पाठीमागे काय चालले आहे याची अँकरला कल्पना नव्हती. ती तिचे काम करत होती. पण जेव्हा तिला कळले की एका महिलेच्या पाठीमागे एक अश्लील व्हिडिओ प्ले होत आहे, तेव्हा ते पाहून तिला धक्का बसला. तर या प्रकारानंतर न्युज चॅनलने संध्याकाळी 11 वाजता दाखवताना झालेल्या चुकीबद्दल क्षमा मागितली.

अजबच! लाइव्ह न्यूज मध्येच 'Adult Video' गेला ऑन एअर आणि...
भारत लसीकरणातही अब्जधीश; ओलांडला 100 कोटी लसीकरणाचा ऐतिहासिक टप्पा

चॅनेलवर अश्लील व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक लोकांनी पोलिसांना याची तक्रार केली. 18 ऑक्टोबर रोजी केआरईएम न्यूज चॅनेलवर एक अश्लील व्हिडिओ प्रसारित करण्यात आला होता, असे शहर पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या संदर्भात तक्रार प्राप्त झाली आहे. आम्ही सध्या या प्रकरणाचा तपास करत आहोत अशी पोलिसांनी माहिती दिली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com