AFCAT Recruitment 2023: देशसेवेचे स्वप्न होणार पूर्ण! भारतीय वायू दलात 276 पदांसाठी भरती, उमेदवारांनी असा करा अर्ज

Government Job: अर्ज करण्याची प्रक्रिया 1 जूनपासून सुरु होणार आहे.
AFCAT Recruitment 2023
AFCAT Recruitment 2023Saam Tv

Indian Airforce AFCAT Recruitment : सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधात असलेल्या आणि देशसेवेचे स्वप्न असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांचे हे स्वप्न पूर्ण होणार आहे. भारतीय हवाई दलाने (Indian Air Force) 276 पदांची भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. एअर फोर्स कॉमन अॅडमिशन टेस्ट II (AFCAT) 2023 च्या भरतीसाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 1 जूनपासून सुरु होणार आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते वायू दलाची अधिकृत वेबसाईट afcat.cdac.in वर जाऊ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात. 1 जूनपासून 2023 अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. तर 30 जून 2023 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. ऑनलाइन अर्ज 1 जूनपासून अधिकृत वेबसाइट afcat.cdac.in वर उपलब्ध होईल. या भरती प्रक्रियेसंदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना वाचावी.

AFCAT Recruitment 2023: महत्वाच्या तारखा -

अर्ज करण्याची प्रकिया सुरु होण्याची तारीख - 1 जून 2023

अर्ज करण्याची अंतिम तारीख - 30 जून 2023

AFCAT Recruitment 2023: पदांचा तपशील -

एएफसीएटी - 11 पदं

ग्राउंड ड्यूटी (टेक्निकल) 109 पदं

ग्राउंड ड्यूटी (टेक्निकल) - 42 पदं

जीडी (नॉन टेक्निकल) - 50 पदं

जीडी (नॉन टेक्निकल) - 10 पदं

जीडी (नॉन टेक्निकल) - 19 पदं

मीटरोलॉजी एंट्री मीटरोलॉजी - 9 पदं

जीडी (नॉन टेक्निकल) - 9 पदं

जीडी (नॉन टेक्निकल) - 17 पदं

AFCAT Recruitment 2023: अर्ज फी -

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 250 रुपये अर्ज फी भरावी लागेल. याशिवाय एनसीसी स्पेशल एंट्रीमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही.

AFCAT Recruitment 2023: शैक्षणिक पात्रता -

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारे उमेदवाराने संबंधित क्षेत्रातील विहित टक्के गुणांसह पदांनुसार पदवी / अभियांत्रिकी पदवी / NCC प्रमाणपत्र इत्यादी पात्रता प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.

AFCAT Recruitment 2023: वयोमर्यादा -

उमेदवारांचे वय फ्लाइंग बॅचसाठी किमान 20 वर्षे आणि कमाल 24 वर्षे असणे आवश्यक आहे.

ग्राउंड ड्यूटी/नॉन टेक्निकलसाठी किमान 20 वर्षे आणि कमाल 26 वर्षे असणे आवश्यक आहे.

AFCAT Recruitment 2023: असा भरा अर्ज -

- afcat.cdac.in किंवा careerairforce.nic.in या वेबसाइटला भेट द्या.

- भरतीशी संबंधित लिंकवर क्लिक करा

- याठिकाणी नोंदणी करा

- लॉगिन करुन अर्जामध्ये संपूर्ण माहिती भरा.

- त्यानंतर स्वाक्षरी आणि फोटो अपलोड करा

- शेवटी पूर्णपणे भरलेल्या अर्जाची प्रिंटआउट काढा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com