अफगाणिस्तानच्या उपराष्ट्रपतींच्या 'त्या' कृत्याने पाकिस्तान हैराण

तालिबान आणि दहशतवाद तुमच्या कोणत्याही जखमेसाठी मलम ठरू शकणार नाहीत
अफगाणिस्तानच्या उपराष्ट्रपतींच्या 'त्या' कृत्याने पाकिस्तान हैराण
अफगाणिस्तानच्या उपराष्ट्रपतींच्या 'त्या' कृत्याने पाकिस्तान हैराणsaam tv

कंधार (Kandhar) : अफगाणिस्तानचे (Afganistan) उपराष्ट्रपती अम्रुल्लाह सालेह (Vice President Amrullah Saleh) यांनी तालिबान्यांना (talobani) पाठिंबा देणार्‍या पाकिस्तानवर (Pakistan) सडकून टीका केली आहे. या टिकेनंतर पाकिस्तानला बरेच दिवस झोप लागणार नाही. सालेह यांनी एक फोटो शेअर केला आहे. १९७१ च्या युद्धानंतर पाकिस्तानी लष्कराने भारतीय सैन्यासमोर (Indian Army) आत्मसमर्पण (Surrender) केल्याचा हा फोटो आहे. आपल्या इतिहासात असे चित्र कधीच नव्हते आणि कधी पाहिलेही जाणार नाही, ट्विट करत अम्रुल्लाह सालेह यांनी अशी सणसणीत टिका केली आहे. अफगाणिस्तान पूर्वीसारख्या परिस्थितीत पोहचण्यासाठी पाकिस्तानला तालिबानला पाठिंबा देत आहे. याच कारणास्तव अफगाणिस्तानने पाकिस्तानवर टिकेची तोफ डागली आहे.

अफगाणिस्तानच्या उपराष्ट्रपतींच्या 'त्या' कृत्याने पाकिस्तान हैराण
पाच पैशाची बिर्याणी पडली महागात! मालकाच्या अंगलट आली आयडिया

काय लिहीले आहे सालेह यांनी ट्विटमध्ये

'आमच्या इतिहासात असे चित्र कधी नव्हते आणि कधीही नसेल. काल आमच्या डोक्यावरून रॉकेट गेले आणि काही अंतरावर जाऊन पडले. त्यावेळी मी क्षणभर थरथरलो. पाकिस्तानातील प्रिय ट्विटर हल्लेखोरांनो, तालिबान आणि दहशतवाद तुमच्या कोणत्याही जखमेसाठी मलम ठरू शकणार नाहीत, अशा जखमा तुम्हाला या फोटोतून मिळाल्या आहेत. आता तुम्ही दुसरा मार्ग शोधा,'' अशा शब्दांत अम्रुल्लाह सालेह यांनी पाकिस्तानला फटकारले आहे.

या फोटोचा अर्थ काय

अम्रुल्लाह सालेह यांनी १९७१ च्या भारत -पाकिस्तान युद्धातील फोटो शेअर केला आहे. १९७१ च्या युद्धात भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. भारताकडून मात मिळाल्यानंतर ८० हजाराहून अधिक पाकिस्तानी सैन्याने भारतापुढे शरणागती पत्करली. यानंतर पाकिस्तानच्या आर्मी चीफने भारतीय लष्करप्रमुखांसमोर आत्मसमर्पण पत्रांवर सही केली. याच क्षणाचा फोटो अम्रुल्लाह सालेह यांनी शेअर करत पाकिस्तानला फटकारले आहे.

पाकिस्तानकडून मिळालेल्या पराभवाचे सालेहने चित्र रेखाटले आहे. भारताने खराब मारल्यानंतर पाकिस्तानने आपला पराभव स्वीकारला. त्यावेळी पाकिस्तानच्या 80 हजाराहून अधिक सैनिकांनी शरणागती पत्करली होती. त्यानंतर पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांनी भारतीय लष्करप्रमुखांसमक्ष आत्मसमर्पण पत्रांवर सही केली. अफगाणिस्तानच्या उपराष्ट्रपतींनी पाकिस्तानच्या पराभवाशी निगडित हे चित्र सामायिक करून टोला लगावला आहे. जुन्या जखमांवर विजय मिळवण्याच्या या प्रयत्नाने पाकिस्तानला थंडी दिली असावी आणि त्याचा चिडचिड लवकरच संपणार नाही हे उघड आहे.

अफगाणिस्तानच्या उपराष्ट्रपतींच्या 'त्या' कृत्याने पाकिस्तान हैराण
भारतात 'या' महिन्यात सुरु होणार रशियाच्या स्पुटनिक V लसीचे उत्पादन

काही दिवसांपुर्वी अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यानंतर तालिबानी कारवाया पुन्हा फोफावल्या आहेत. तालिबान्यांनी देशातील अनेक भाग बळकावल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानदेखील तालिबान्याची पुरेपुग मदत करत आहे. अलीकडेच तालिबान्यांनी अफगाणिस्तानाची राजधानी काबुलमध्ये राष्ट्रपती पदाच्या निवासस्थानाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत तीन रॉकेट डागले होते. या हल्ल्यामागेही पाकिस्तानचा हात असल्याचे अफगाणिस्तानला संशय आहे.

Edited By- Anuradha

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com