पाकिस्तान विरोधात घोषणा देत अफगाणी जनतेने काढला मोर्चा; तालिबाननं केला गोळीबार

अफगाणिस्तानची जनता पाकिस्तानच्या विरोधात रस्तावर उतरली आणि पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणा दिल्या. या आंदोलनकर्त्यांना पांघवण्यासाठी तालिबान्यांनी हवेत गोळीबार केला.
पाकिस्तान विरोधात घोषणा देत अफगाणी जनतेने काढला मोर्चा; तालिबाननं केला गोळीबार
पाकिस्तान विरोधात घोषणा देत अफगाणी जनतेने काढला मोर्चा; तालिबाननं केला गोळीबारtwitter/@TOLOnews

काबुल: तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर अफगाणिस्तानात अराजकता माजली आहे. आपण पारतंत्र्यात गेलो याचं दुःख प्रत्येक अफगाणी नागरिकाच्या मनात आहे. मात्र असं असलं तरी तालिबानला न भिता अनेक नागरिक तालिबानच्या विरोधात रस्त्यावर उतरत आहेत. काल सोमवारी अफगाणिस्तानची जनता पाकिस्तानच्या विरोधात रस्तावर उतरली आणि पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणा दिल्या. या आंदोलनकर्त्यांना पांघवण्यासाठी तालिबान्यांनी हवेत गोळीबार केला.

हे देखील पहा -

पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचे प्रमुख लेफ्टनंट जनरल फैज हमीद यांनी तालिबान्यांचा नेता मुल्ला अब्दुल गनी बरदार याची भेट घेतली. ही भेट अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबुलमध्ये झाली. तालिबानला पाकिस्तानने मदत केल्याचा आरोप अफगाणी जनतेने केला आहे.

पहा व्हिडिओ -

याशिवाय तालिबान विरोधात लढा देत असलेल्या पंजशीर प्रांतामधील नॉर्दन अलायन्सच्या सैनिकांवर पाकिस्तानने हवाई हल्ला केला असल्याचा आरोप कमांडर अहमद मसूदने केला आहे. त्यामुळे पाकिस्तानने तालिबानला मदत केल्याचा प्रचंड राग अफगाणिस्तानच्या जनतेमध्ये आहे. त्यामुळेच अफगाणी जनतेने रस्त्यावर उतरुन पाकिस्तानविरोधात घोषणा देत देश सोडून जाण्यास सांगितले आहे.

पाकिस्तान विरोधात घोषणा देत अफगाणी जनतेने काढला मोर्चा; तालिबाननं केला गोळीबार
बाप्पाच्या मूर्तींनाही इंधनाची झळ

अफगाणिस्तानमधील टोलो न्यूजच्या माहितीनुसार काबुलमध्ये स्थित पाकिस्तानच्या दुतावासासमोर हजारोंच्या संख्येने लोकं जमली आणि पाकिस्तानविरोधात घोषणा दिल्या. पाकिस्तान मुर्दाबाद, आमच्या देशातून निघून जा, आम्हाला स्वतंत्र्य हवे आहे अशा घोषणा त्यांनी दिल्या. त्यामुळे जमावाला पांघवण्यासाठी तालिबान्यांनी हवेत गोळीबारही केला. सध्या तालिबान सरकार स्थापन करण्यासाठी अफगाणिस्तानमध्ये जोरदार हालचाली सुरु आहेत.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com