अफगाण महिलांना क्रिकेट खेळण्याची परवानगी नाही दिली तर...

अफगाणिस्तान मधील महिलांना क्रिकेट खेळण्याचे स्वातंत्र्य मिळाले नाही.
अफगाण महिलांना क्रिकेट खेळण्याची परवानगी नाही दिली तर...
अफगाण महिलांना क्रिकेट खेळण्याची परवानगी नाही दिली तर...Saam Tv

वृत्तसंस्था : अफगाणिस्तान मधील महिलांना क्रिकेट खेळण्याचे स्वातंत्र्य मिळाले नाही. तर आम्ही पुरुष संघाबरोबर पूर्वनियोजित कसोटी खेळणार नाहीत, असा स्पष्ट इशारा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने तालिबानका दिला आहे. याअगोदर, महिलांकरिता क्रिकेट खेळणे आवश्यक नाही, असे तालिबानच्या सांस्कृतिक आयोगाचा उपाध्यक्ष अहमदुल्लाह वासिकने सांगितले होते.

हे देखील पहा-

यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा इशारा देण्यात आला आहे. त्याअगोदर ऑस्ट्रेलियाचे क्रीडा मंत्री रिचर्ड कोलबेक यांनी देखील या याप्रकरणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे कारवाईची मागणी करण्यात आली होती. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितले आहे की, ऑस्ट्रेलियन क्रिकेट जगभरात महिला क्रिकेटच्या विकासाला अत्यंत महत्त्वाचे स्थान देतेत. खेळ सर्वांकरिता आहे. महिलांनाही सर्व स्थरांवर खेळण्याचा समान अधिकार आहे, असे आम्ही मानत असतो.

अफगाण महिलांना क्रिकेट खेळण्याची परवानगी नाही दिली तर...
Afghanistan : तालिबानचे नवीन सरकार गठीत, मुल्ला हसन अखुंद पंतप्रधानपदी

अफगाणिस्तान मधील सत्तांतरानंतर, लोक दहशतीखाली आहेत. अगदी क्रिकेटपटू राशिद खान देखील या विषयी ट्विट करून आपल्या लोकांना वाचविण्याचे आवाहन करण्यात आले होते. याशिवाय, नुकतेच, माध्यमांना सांगितले आहे, की अफगाणिस्तान मध्ये महिला क्रिकेटला पाठिंबा दिला जाणार नाही. असे असेल.

होबार्ट मधील प्रस्तावित पुरुष संघासोबत कसोटी सामन्याचे आयोजन रद्द करण्याशिवाय ऑस्ट्रेलियाकडे कोणताच पर्याय नसणार आहे, असेही क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितले आहे. महत्वाचे म्हणजे, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात होबार्ट या ठिकाणी २७ नोव्हेंबर पासून १ कसोटी सामना खेळला जाणार आहे. मात्र, तालिबान सरकारने महिला क्रिकेटसंदर्भात घेतलेल्या भूमिकेने, आता या सामन्यावर संकट ओढले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com