Afganistan | तालिबानच्या हल्ल्यात अमरुल्लाह सालेह यांचा भाऊ ठार

अमरुल्लाह सालेह यांचे भाऊ रोहूल्ला सालेह हे तालिबानशी संघर्ष करताना मरण पावले आहेत. याबाबत खात्रीशाीर माहिती मिळालेली नाही, मात्र तालिबानने हा दावा केला आहे.
Afganistan | तालिबानच्या हल्ल्यात अमरुल्लाह सालेह यांचा भाऊ ठार
Afganistan | तालिबानच्या हल्ल्यात अमरुल्लाह सालेह यांचा भाऊ ठारSaam Tv News

काबुल: अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार आलं मात्र तिथला रक्तपात अजूनही थाबलेला नाही. पंजशीर प्रांत ताब्यात घेतला असल्याचा दावा तालिबानने केला असला तरी पंजशीर प्रांताचे कमांडर अहमद मसूद आणि अफगाणिस्तानचे काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांनी मात्र शरणागती पत्करलेली नाही, त्यामुळे पंजशीरच्या काही भागात अजूनही युद्ध सुरुच आहे. अशातच आता अमरुल्लाह सालेह यांचे भाऊ रोहूल्ला सालेह हे तालिबानशी संघर्ष करताना मरण पावले आहेत. याबाबत खात्रीशाीर माहिती मिळालेली नाही, मात्र तालिबानने हा दावा केला आहे.

हे देखील पहा -

तालिबाबनने दावा केला आहे की, ज्या वाचनालयातून अमरुल्लाह यांनी काही दिवसांपुर्वी व्हिडिओ पोस्ट केला होता. त्याच वाटनालयात आता तालिबान घुसला आहे. तालिबानने याचा एक व्हिडिओ पोस्ट केली आहे त्यामुळे अनेकांसाठी ही एक धोक्याची घंटा आहे. तालिबानने त्याचे दहशतवादी लायब्रेरीत घुसतानाचे फोटो जारी केले आहे.

Afganistan | तालिबानच्या हल्ल्यात अमरुल्लाह सालेह यांचा भाऊ ठार
जय माता दी: १४ किमी पायी चालत राहुल गांधी वैष्णोदेवीला पोहोचले

तिकडे पंजशीरमध्ये तालिबान आणि नॉर्दन अलायन्समध्ये जोरदार संघर्ष सुरु आहे. अहमद मसूद यांचे समर्थक मार्शल दोस्तम यांनी जगाकडे मदत मागिलती आहे.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com